आजवरि होतों तुझे सत्तेखाली | तोवरि तों केली विटंबना - Page 404

३६० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

असेल तें केवळ काळाच्या परिस्थितींत जें कांही आशा करण्याजोगें परिवर्तन घडलें

इंग्रज सरकारनें कांही विशेष ओघामुळेंच घडलें आहे. तें घडवून आणण्यास

नव्हे तर प्रयत्न केले याची ग्वाही आम्ही देऊ शकत नाहीं. इतकेंच इंग्रजांच्या हातून अस्पृश्योन्नती होईल अशी आशा बाळगणे व्यर्थ आहे, असे आमचें मत आहे. याचें कारण इंग्रज सरकारच्या हातीं अस्पृश्योन्रती करण्याइतकीं सत्ता नाहीं असे नाहीं. इंग्रज सरकारनें मनांत आणले असते तर सर्व अस्पृश्यांची सार्वजनिक ठिकाणची अस्पृश्यता गेली असती, पलटणींत, पोलीसांत, आरमारांत व इतर सरकारी खात्यांत त्यांची भरती झाली असती, शिक्षणाचा इतका प्रसार झाला असतां कीं, कोणताही अस्पृश्य निरक्षर राहिला नसता. व पडीक जमीनिवर अस्पृश्य लोकांच्या वसाहती करून त्यांचा संसार सुखानें चालविण्यास मदत केली असती. यापैकी एकही गोष्ट इंग्रजसरकारनें केली नाही. इतकेंच नव्हे, तर ज्या अस्पृश्य लोकांनी इंग्रजास मदत करून या देशाचे राज्य कमाऊन

दिलें, त्याच इंग्रजसरकारनें अस्पृश्य लोकांची सैन्यांत भरती करण्याचे बंद केले. कांहीं अस्पृश्य लोक असें म्हणतील की, स्पृश्य जनतेचा विरोध होईल

म्हणून इंग्रज सरकारनें वरील गोष्टी करण्याचें हातीं घेतलें नाही. अर्थात इंग्रज सरकारनें अस्पृश्योन्नति प्रीत्यर्थ जर कांहीं प्रयत्न केले नसतील तर त्याचे

खापर सर्वस्वी विरोधी स्पृश्य जनतेच्या माथी फोडले पाहिजे. परंतु जसें न कर्त्याचा वार शनिवार तसें स्पृश्य जनतेचा विरोध ही केवळ सबब नसेल

कशावरून ? हिंदुस्थान देशांत अनेक धर्म, अनेक जाती, व अनेक पंथ आहेत. त्यामुळें एका धर्माचे व जातीचे लोक दुसऱ्या धर्माच्या व जातीच्या लोकांवर जोर जुलूम करतात व त्यास अन्यायानें वागवितात म्हणून इंग्रजांचे राज्य

या देशांत राहिले पाहिजे असें इंग्रज सरकार म्हणते. अर्थात या अन्यायाची आयुमर्यादा जितकी लांबविता येईल तितकी बरी असें इंग्रज सरकारास वाटणें अगदी नैसर्गिक आहे. कारण त्यांच्याच राजकारणाच्या तत्वानुरोधानें ज्या दिवशीं हे सामाजिक अन्याय बंद होतील त्या दिवशी इंग्रजी राज्याचा शेवट करणे त्यांना क्रमप्राप्त होईल. सामाजिक अन्यायाचा व इंग्रजी राज्याचा असा जेथें लागा बांधा आहे, तेथें सामाजिक अन्याय जोपर्यंत राहतील तोपर्यंत तसेंच राहूं देण्याकडे इंग्रजांचा कल आहे. म्हणूनच स्पृश्य जनतेची सबब पुढें करून ते अस्पृश्यतेसारखा अन्याय खपवून घेत आहेत असा जर कोणी इंग्रजावर आरोप केला तर तो मनुष्यमात्राच्या नेहमीच्या व्यापाराविरूद्ध होईल असें कोणास सहसा

म्हणतां येणार नाहीं. नाहींतर सत्तावनसालाचें बंड ज्या सरकारनें हा हा म्हणतां मोडले, रौलट अँक्टाविरूद्ध प्रतिकार करणाऱ्या लोकांची ज्यांनी जालियनवाला बागेत कत्तल उडविली, तें सत्ताधीश इंग्रज सरकार अस्पृश्योन्रतीच्या बाबतींत