आजवरि होतों तुझे सत्तेखाली | तोवरि तों केली विटंबना - Page 405

आजवरि होतों तुझे . . . केली विटंबना ३६१

स्पृश्य जनतेच्या विरोधास भीते, या म्हणण्यावर कोणाचाच विश्वास बसणे शक्य नाही. इंग्रज सरकार जर खरोखरच स्पृश्य जनतेला भीत असेल तर असल्या भ्याड वृतीच्या सरकारापासून अस्पृश्यांना लाभ तो कोणता? उलटपक्षी इंग्रज सरकार स्पृश्य जनतेच्या विरोधाची सबब पुढें करून, अस्पुश्योन्नतीचे कार्य टाळीत असेल तर असल्या कर्तव्यपराङ्मुख सरकारवर विसंबून काय उपयोग ? भयामुळें म्हणा किंवा स्वार्थामुळें म्हणा, इंग्रज सरकार हाती असलेल्या सत्तेचा आपल्या कामीं जर कांहीं उपयोग करीत नाहीं, तर आहे ती सत्ता त्याच्या हातीं तशीच ठेवा, ती काढून घेऊ नका असें म्हणण्यांत काय हंशील आहे ? तीच राजकीय सत्ता इंग्रजांच्या हातांत असण्यापेक्षा अस्पृश्यांच्या हातांत असती तर, ज्या सुधारणा सत्ता असूनही इंग्रजसरकारने केल्या नाहींत व ज्या करणे अवश्य होते, त्या सुधारणा घडवून आणल्याशिवाय ते स्वस्थ बसले नसते. ज्याचे कल्याण तोच करील, दुसरा कोणी करणार नाही. या न्यायानें पाहतां अस्पृश्यांचे कल्याण जितकें अस्पृश्यलोक करूं शकतील तितकें इंग्रज देखील करूं शकणार नाहींत. यासाठी अस्पृश्यांनी स्वकल्याणाचे काम परक्यांवर सोपविण्याचेऐवजी स्वतःचे हातीं घेणे बरें. हिंदूंवर विशवास ठेवून ते चालत नाहींत, ही शहाणपणाची गोष्ट होय. पण इंग्रज सरकारवर विसंबून राहणे, ही कांही शहाणपणाची गोष्ट नव्हें. खरा शहाणपणा कोणावरही विश्वास न ठेवितां स्वत:वर विश्वास ठेवणें यांतच आहे. दोघांच्याहि सत्तेखाली उन्नति झालेली नाही. झाली ती विटंबनाच झाली आहे. म्हणून

स्वावलंबन हेंच अस्पृश्यांचे ध्येय असले पाहिजे

डॉ. आंबेडकर व डॉ. सोलांकी यांनी जी अस्पृश्यवर्गातफ सायमनकमिशनपुढें साक्ष दिली त्या साक्षींत हेंच ध्येय मांडले होतें. आणि म्हणनूच या इलाख्यांत स्वराज्य स्थापन करा कीं जेणे करून राजकीय सत्ता जनतेच्या हातांत येईल, अशी मागणी करण्यास त्यांनी मागें पुढें पाहिलें नाहीं. यावर कांही अस्पृश्यलोक अशी शंका घेतील कीं, या स्वराज्याच्या मागणीनें हिंदुसमाजाच्या सामाजिक, आर्थिक व धार्मिक जुलुमाच्या आड घातलेले इंग्रजी सत्तेचे सुदर्शन लोपून, स्वराज्याच्या TATA आमच्यावर प्रत्यक्ष आघात झाल्याशिवाय राहणार नाही. हैं स्वराज्य म्हणजे आमच्यावर राज्य होईल. आमच्यामतें ही शंका व्यर्थ आहे. कारण स्वराज्य मागतांना त्यांत थोडे बहूत आपलेही राज्य होईल अशी मागणी मागण्यांत आलेली आहे. अस्पृश्यवर्गाचे भरपूर प्रतिनिधी मागितले असल्यामुळें स्वराज्य म्हणजे अस्पृश्यांवर राज्य असें तर होणार नाहींच, परंतु राजकीय सत्तेचा बराचसा भाग अस्पृश्य वर्गाच्या हातांत येईल. सायमन