ब्राह्मण्य म्हणजे बहुजन . . . आधारलेले जाति वर्चस्व ३६५
व कै. टिळक बोलतील त्याला जिकडे तिकडे टाळ्या मिळू लागल्या. टिळक म्हणतील तें ब्रह्मवाक्य असें मानण्याचा जणुं शिरस्तांच पडून गेला; व अडाणी लोकांच्या मूढपणाचा फायदा घेऊन टिळकांनींही त्यांना वाटेल तसें झुलविले. समाजसुधारणेचें कार्य अराष्ट्रीय होय अशी विचारसरणी कै. टिळकांनीच प्रचलीत करून दिली. आज जे टिळकशिष्य म्हणवितात त्यांची हीच विचारसरणी आहे. काळ बदल्यामुळे व मागासलेल्या वर्गात जागृति होऊं लागल्यामुळें त्यांना अर्थातच आपला पवित्रा बदलावा लागला आहे. पण या परंपरेचा देह स्वभाव मात्र अद्याप बदलला नाही, व सहजासहजीं तो बदलेल अशी आशाही नाहीं.
३ या परंपरेच्या तावडींत कोणीही सांपडो, तो माणुसकीला मुकावयाचा असा अनुभव आहे. मग तो ब्राह्मण असो, पारशी असो, खिश्चन असो अगर दलित अस्पृश्य वर्गापैकीं असो. तो राजकीय स्वातंत्र्याच्या लंब्याचवड्या बाता मारील. पण समाजसुधारणेच्या क्षेत्रांत मात्र त्याच्या मनाची गति चालणार नाहीं. चाललीच तर काळकामवेगाच्या उदाहरणांत अ ज्याप्रमाणें चार मैल पुढे जातो व दहा मैल मागें येतो त्याप्रमाणें चालेल. हल्लीं या परंपरेनें जी हिंदुसंघटनाची
चळवळ चालविली आहे, तिच्यावरून हीच गोष्ट दृष्टोत्पत्तीस येते. हिंदुसंघटनाचें
कार्य हें वास्तविकपणें प्रगतिसूचक आहे. पण या परंपरेने जी हिंदुसंघटनाची
चळवळ चालविली आहे, तिच्यावरून हीच गोष्ट दृष्टोत्पत्तीस येते. हिंदुसंघटनाचे
कार्य हें वास्तविकपणें प्रगतिसूचक आहे. पण या परंपरेने, हिंदुसंघटनाच्या मिषाने ब्राह्मणी धर्माची पकड हिंदुसमाजावर कायम करण्यासाठी ही चळवळ हातीं घेतली आहें. अशा तऱहेने, पुरोगतींत पुच्छगती साधणारी ही परंपरा, हिनेंच महाराष्ट्रातील समाजसुधारणेचे कार्य अत्यंत दुष्कर करून ठेवले आहे. इतर प्रातांतील सुधारकांना सरळ व प्रामाणिक पुराणमतवादाशीं झगडावें [लागतें. ] पण महाराष्ट्रीय सुधारकांना पुराणमतवादाचा बुरखा सोयीखातर पांघरणाऱ्या [या ] परंपरेला लाथाडीत मार्ग काढावयाचा आहे. या परंपरेनें पछाडलेले लोक काँग्रेसमध्ये शिरोत, हिंदु सभेंत उपस्थित होवोत, अगर स्वातंत्र्यसंघात घुसोत, [तेथें ] तेथें ते आपल्या शेपटाचा वाकडेपणा दाखविल्याशिवाय रहात [नाहींत. ] हिंदी स्वातंत्र्यसंघाच्या महाराष्ट्रीय शाखेच्या जाहीरनाम्यावरून [ही ] [गोष्ट ] [दृष्टोपत्तीस ]
येते.
४ बंगालशाखेच्या जाहीरनाम्यांत राजकीय पारतंत्र्याइतकाच सामाजिक दास्यत्वाच्या उच्चाटणावरही जोर दिला आहे. पण महाराष्ट्र शाखेने मात्र या बाबतींत मूकवृत्ति धारण केली आहे. अस्पृश्य समाजाला सामाजिक हक्क मिळवून देणें असा एक उद्देश या संघाच्या कार्यक्रमांत ग्रथित करण्यांत आला आहे.