महार वतन बिलावरील कांहीं आक्षेप - Page 414

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ३७०

आहे. या विरोधकांचा मुख्य कटाक्ष बिलाच्या सहाव्या कलमावर

या सहाव्या कलमाचें स्वरूप कसें आहे, हे बिलाचा मराठी तर्जुमा जो आजच्या अंकांत दुसरीकडे छापण्यांत आला आहे! त्यावरून स्पष्ट होईल. या सहाव्या कलमाप्रमाणे वतनदार महारांनी धान्यरूपानें मिळावयाचें बलुतें द्रव्यरूपानें मिळावें असा कलेक्टरकडे अर्ज केला तर तशी अंमलबजावणी कलेक्टरनें करावी व सदर बाब शेतसाऱ्यादराबर वसूल करून तिचें उत्पन्न सरकारी तिजोरींतून महार वतनदारांना देण्यांत यावे असें सहाव्या कलमाच्या पहिल्या पोटकलमांत सांगितलें आहे. जेथें हे बलुतें सरकारच्या व रयतेच्या नोकरीबद्दलचा मोबदला म्हणून ठरलें गेलें असेल तेथें त्याच्याऐवजीं मागितलेल्या नगदी वेतनापैकी सरकारी नोकरीबद्दल किती व रयतेच्या नोकरीबद्दल किती ते ठरवून देण्याविषयी

HANGS अर्ज करण्यांत आला तर तशी व्यवस्था कलेक्टरनें करावी. हा

पोटकलम २ याचा मतलब आहे. पोटकलम ३ यांतील मागणी अशी आहे कीं रयतेची नोकरी करणें वतनदार महारांच्या मर्जीवरच अवलंबून आहे. मात्र त्यांनीं रयतेची नोकरी करण्याचें सोडलें तर रयतेच्या नोकरीबद्दलचा नगदी वेतनाचा जो भाग ठरला गेला असेल त्यावर त्यांचा हक्क राहणार नाही. वरीलप्रमाणें बिलाच्या ६ व्या कलमाचें स्वरूप आहे. यावर आक्षेप घेणारांमध्ये पुण्याचा “ शेतकरी संघ,“ अहमदनगरचा "दीनमित्र “ व बेळगांवचा ''राष्ट्रवीर” या त्रयींची प्रामुख्यानें गणना करणें प्राप्त आहे. त्यांच्यामते कलम ६ यांत सुचविलेली व्यवस्था अंमलात आली तर या कलमान्वयें

शेतकऱ्यांवर एक नव्या कराची धोंड बसेल.

आम्ही या बाबतींत शक्य तेवढा विचार केला आहे. परंतु ६ व्या कलमाने शेतकऱ्यांवर नवा कर लादला जाईल या म्हणण्यास कोणता आधार आहे तो आम्हांला दिसत नाहीं. या६व्या कलमावर यांचा एवढा कटाक्ष असण्याचें कारण या कलमात महारांना रयतेची नोकरी नाकारण्याचा अधिकार दिला असतां सरकारी कामापुरतां रयतेपासून बलुतें मागण्याचा हक्क राखून ठेवण्यांत आला आहे हें होय. रााष्ट्रवीरकारांच्या मतें “वतनदार महारांना शेतकऱ्यांकडून जो बलुता मिळतो तो प्रामुख्यानें रयतोपयोगी नोकरीकरितांच होय. सरकारी नोकरीसाठी त्यांना पाटील, कुळकर्णी व सननय्ांप्रमाणेंच जमिनीच देण्यांत आलेल्या आहेत.” अथात्‌ महारांना रयतेचीं कामें न करतां रयतेपासून बलुते मग तें कोणत्याहि अंशाने कां होईना मागण्याचा हक्क देणें हें विनाकारण रयतेवर नवा

1 पाहा, परिशिष्ट क्रमांक-४२.

डब्ल्यू-२०७३-२४ ब