देशभक्त लाला लजपतराय राजकारण व समाजकारण यांत क्रांतिकारक. - Page 422

३७८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

लोकांना तो साहजिकपणेंच अप्रिय होता. पुराणमतवाद व आर्यसमाज यांच्या या लढ्यात लालाजींनीं आर्यसमाजाची बाजू घेतली, व त्या समाजाची तत्वें दृढमूल करण्यासाठीं त्यांनीं कांहीं मित्रांच्या सहाय्यानें १८८६ साली दयानंद अँग्लोवेदिक कॉलेजची स्थापना केली. त्यांच्या सार्वजनिक आयुष्यक्रमाला आरंभ याच गोष्टीनें झाला. ही संस्था ऊर्जितावस्थेस आणण्यासाठीं त्यांनीं अविश्रांत मेहनत केली, व पुष्कळ स्वार्थत्याग केला. आज ही संस्था पंजाबांत एक प्रमुख शिक्षण संस्था म्हणून गणली जाते.

४. या नंतर ते राजकीय चळवळींतही भाग घेऊं लागले. पण इतर राजकीय चळवळ्यांप्रमाणें त्यांनी राजकारण व समाजकारण यांची फारकत करून आपल्या पंगुपणाचें प्रदर्शन कधींचे केलें नाही. दोन्ही बाबतींत ते क्रांतिकारक होते. राजकीय चळवळींत पडल्यामुळे सरकारानें जेव्हां त्यांना अंदमानला पाठविलें, त्यावेळीं बऱ्याच पुराणमतवादी लोकांना आनंद झाला होता हें ध्यानात ठेवण्यासारखें आहे. सरकार व पुराणमतवादी लोक यांच्या विरोधातून अशा रितीनें लालाजींनीं आपला सार्वजनिक कार्यक्रम चालविला. पंजाबातील कांहीं स्पृश्यवर्मीय पुढाऱ्यांनीं चालविलेल्या अस्पृश्यांच्या स्पृश्यीकरणाच्या चळवळींत ते मनापासून भाग घेत. स्पृश्यवर्गीय लोकांनीं चालविलेल्या ' अस्पृश्योद्धारा ' च्या चळवळी आम्हांला जरी पूर्णतः समाधानकारक वाटत नसल्या, तरी लालाजींनी सहानुभूती प्रामाणिकपणाची होती याबद्दल आम्हांला शंका वाटत नाहीं. आमच्या दृष्टीनें ती अपुरी असली तरी अविश्वसनीय खास नव्हती.

५. लालाजी हे उत्तम लेखकही होते. सामाजिक व राजकीय विषयावर त्यांनीं अनेक ग्रंथ लिहिले आहेत. ' दी पीपल ' नांवाचें इंग्रजी पत्र ते चालवित होते. दयानंद कॉलेज शिवाय त्यांनीं स्थापन केलेली दुसरी संस्था म्हणजे weedy ऑफ पीपल सोसायटी ही होय. मुंबईच्या सर्व्हटस्‌ ऑफ इंडिया सोसायटीच्या धर्तीवर या संस्थेची घटना केलेली असली, तरी दोहोंच्या अंतरंगांत महत्त्वाचा भेद आहे. मुंबईची सोसायटी ' नेमस्त ' लोकांच्या ताब्यांत असल्यामुळे, तिचा सर्वच कार्यक्रम नेमस्तपणाचा आहे. राजकीय बाबतींत नेमस्तपणा व सामाजिक बाबतीतही नेमस्तपणा. एक पाऊल पुढें टाकण्याच्या पूर्वी दहा तास विचार करावयाचा अशा प्रकारचा या संस्थेचा कार्यक्रम आहे. या संस्थेचे कांहीं सभासद व्यक्तिशः जहाल पुरोगामी असतील. पण “ जातीशः “ त्यांना नेमस्तपणाच्या चाकोरींत घुटमळत रहाणें भाग आहे. याच्या उलट लाहोरच्या सोसायटीला लालाजी सारखा तडफदार नेता लाभल्यामुळें तिला सर्वांगीण प्रगतिपर स्वरूप प्राप्त झालें आहे. सामाजिक व राजकीय बाबतीत सारखेच