डॉ. आंबेडकरांनी स्वाभिमानाच्या व स्वावलंबनाच्या पायावर सुरू केलेल्या चळवळीविषयी द्वेषमूलक भावना - Page 425

डॉ. आंबेडकरांनी स्वाभिमानाच्या . . . द्वेषमूलक भावना ३८१

एवढेच करून म्यु. थांबती तर कांहीं हरकत नव्हती. डॉ. आंबेडकरांनीं अस्पृश्य वर्गाची चळवळ स्वाभिमानाच्या व स्वावलंबनाच्या पायावर सुरू केल्यापासून, त्यांच्यावर महान्‌ हिंदु जातीच्या पांजरपोळांतून जीं अनेक कुत्री भुंकू लागलीं आहेत त्यांपैकींच हें एक असें म्हणून स्वस्थ बसतां आलें असतें. पण म्यु. ने याच्या पुढें जाऊन “ बोडींगची ग्रँट थांबविण्यांत आली ती बोडीँगच्या जमाखर्चात अंधाधुंदी माजल्याबद्दल म्यु. ची खात्री झाली म्हणून “ असें प्रसिद्ध केलें आहे. अव्यवस्थेचे व अंधाधुंदीचे हे आरोप हल्लीं इतके शिळे झाले आहेत कीं त्यांचे निराकरण करण्याच्या भरीस पडण्यात कांहीं अर्थ नाहीं. तरी पण प्रस्तुत आरोप इतका खोडसाळपणाचा आहे कीं या बाबतींत खरी वस्तुस्थिती काय आहे हें प्रसिद्ध केल्याशिवाय स्वस्थ बसतां येण्याजोगें नाही. सोलापूरचे बोडीँग १९२५ सालीं उघडण्यात आलें. सुरवातीपासून म्यु. नें बोर्डीगला ग्रँट चालू केले. व १९२५/२६ या दोन वर्षाची ग्रँट नियमितपणें देण्यांतही आली. पण १९२७ च्या निवडणूकीनंतर म्यु. चें धोरण एकदम बदललें. विशेषतः डॉ. व्ही. व्ही. मुळे हे म्यु. चे अध्यक्ष झाल्यापासून हा बदल दृश्यमान होऊं लागला. या वर्षाच्या आरंभींच स्कूलबोर्डाच्या अध्यक्षांनी बोर्डीगला आकस्मिक भेट दिली व जमाखर्च तपासून पाहिला. खर्च व्यवस्थित ठेवलेला आहे असा शेराही त्यांनीं दिला. याशेऱ्याची प्रत सुपरिंटेंडंटनी म्यु. च्या अध्यक्षांकडे पाठवून दिली. पण अध्यक्ष महाशयांचे त्यांयोगे समाधान न होतां, त्यांनीं १९-३-१९२८ रोजीं सुप. ला पत्र लिहून १९२५-२६ सालच्या हिशोबाची बुकें तपासण्याकरिता मागवली. हीं बुके मुंबईला बहिष्कृत हितकारिणी सभेच्या हेडऑफिसांत पाठविण्यांत आलीं असल्यामुळें व नेहमींच्या रिवाजाप्रमाणे तीं नष्ट करण्यांत आल्यामुळें आपल्याला तीं पाठवितां येणें अशक्य आहें असें सुप. नी अध्यक्षांना कळविले. चालूवर्षांचें हिशेबबूक पाठविण्यास ते तयार होते. यावेळीं हिशोब तपासण्यासाठी म्यु. नें स्कूल बोर्डचिं उपाध्यक्ष श्री. बुवालाल वकील व सभासद सदाशिव अप्पा देशमुख यांची कमिटी नेमली. या कमिटीनें आपला रिपोर्ट ता. २-५-१९२७ रोजी सादर केला. त्यांत जमाखर्च बिनचूक असल्याची कबुली दिली आहे. पण अध्यक्षांना हा रिपोर्टही समाधानकारक वाटला नाहीं, व १९२५-२६ सालचे हिशेब पाहिजेतच असा त्यांनीं आग्रह धरला. पूर्वी निर्दिष्ट केल्याप्रमाणें हा आग्रह पूर्ण करणें अशक्य होतें. यानंतर म्यु. च्या अंडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफीसरनीं बोडींगचे हिशेब तपासले व त्यांत कांहीं चूक नाहीं असा शेरा दिला. यानंतर मात्र अध्यक्षांना लज्जा उत्पन्न झाली की काय नकळे त्यांनीं मागील हिशेबांविषयींच्या आपल्या प्रेमाचा संन्यास केला, व चालूवर्षाचे (१९२७) हिशेब मागविले. पण इतरांप्रमाणेंच त्यांनाही त्यांत चूक आढळणें शक्य नव्हतें. अशा रीतीनें नाइलाज