३८२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
झाल्यावर अध्यक्षांनी, बजेटच्या वेळीं बोर्डीगची ग्रँट बंद करावी असा ठराव आणला. पण तेथेही दुर्दैवानें त्यांची पाठ पुरविली. त्यांच्या, विरोधी पक्षानेंच नव्हे, तर त्यांच्या पुङ्यातील लोकांनींहि हा ठराव हाणून पाडला. या ठरावाला फक्त एकच मत अनुकूल मिळालें.
खरा प्रकार काय आहे तो यावरून ध्यानांत येईल. बोडीँगची ग्रँट बंद करणें, व अशारीतीने त्याचें अस्तित्व धोक्यात आणणें हा अध्यक्षांचा हेतु होता. बोडीँगचे हिशेब अव्यवस्थित आहेत हें सिद्ध झाल्यास, हा हेतु साध्य होणें सुकर होतें. पण अध्यक्षांच्या दुर्दैवाने तें सिद्ध झालें नाहीं. उपरिनिर्दिष्ट बुवालाल वकील व शिवदास देशमुख हे गृहस्थ अध्यक्षांच्या पुङ्यांतील होते. पण त्यांनाहीं जमाखर्च बिनचूक ठेवला सल्याची कबुली द्यावी लागली. अॅडमिनि्ट्रेटिव्ह ऑफिसरसारख्या जबाबदार अधिकाऱ्याचा शेराही अध्यक्षांना ध्यानांत न घेऊन चालण्यासारखे नव्हतें. अशा wed अव्यवस्थेचें व गैरशिस्तपणाचें कायम ठशाचें थोतांड निरुपयोगी ठरल्यावर अध्यक्षांनी ग्रँट बंद करण्याचा ठराव आणला. लक्षांत ठेवण्याची गोष्ट ही कीं हा ठराव पास झालेला नाहीं. अर्थात् म्यु. नें ग्रँट बंद केली हें म्हणणेंच खोटें आहे. जमाखर्चातील अव्यवस्थेमुळेंच नव्हे तर कोणत्याही कारणाने म्यु. नें ग्रँट बंद केली नाहीं. अध्यक्षांचा ठराव नापास करून बोडीँगची ग्रँट चालू ठेवण्याचें म्यु. नें बहुमतानें ठरविलें असतांही, अध्यक्षांनीं ग्रँट बंद ठेवली आहे असा खरा प्रकार आहे.
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ७ डिसेंबर १९२८.