३८४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
हक्कांचीं मागणी त्यानें करतां कामा नये. आपला राजकीय दर्जा वाढविण्याची त्यानें खटपट करतां कामा नये. स्पृश्य हिंदूंची हीच मनोभावना आहे व म्हणूनच ज्या योजनांमुळे अस्पृश्य लोक आपल्याबरोबरीचे होण्याचा संभव आहे, त्यांना ते असा विरोध करीत आहेत.
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ७ डिसेंबर १९२८.