८४
सहविवाह हीच समतेची खरी कसोटी
नाशिक येथे हिंदुसमाजसमतासंघ] नांवाची संस्था नुकतीच स्थापन झाली असून स्पृश्यास्पृश्यांत समता प्रस्थापित करणें हें तिचें ध्येय आहे. पण हें ध्येय
पूर्णपणे साध्य व्हावें असें संघाला वाटत असल्यास त्यांनें आपला कार्यक्रम आहे त्यापेक्षां जास्त सकस व जोरदार ठेवणें जरुरीचें आहे असें आम्हाला वाटते. भंगी
लोकांच्या देवळांत स्पृश्य हिंदूंना नेण्यापेक्षां, भंगी लोकांनाच स्पृश्य हिंदूंची देवालयें
खुलीं करणें हें समतेच्या दृष्टीनें जास्त इष्ट आहे. त्याप्रमाणें सहभोजनें घडवून
आणतांना तीं बकाली स्वरुपाचीं न होतां कौटुंबिक होतील अशी व्यवस्था करणें फायद्याचे आहे. आणि शेवटीं सहभोजनाच्या कार्यक्रमाला सहविवाहाची जोड
देणे अवश्य आहे. सहविवाह हीच समतेची खरी कसोटी. बाकीच्या कार्यक्रमांत पळवाटा काढणें शक्य आहे. भंग्यांच्या देवळांत जाऊन आल्यावर स्नान करून ' शुद्ध ˆ होणें हिंदूंना सहज साध्य आहे. - सहभोजनानंतर प्रायश्चित घेणेही कठीण नाहीं. पण सहविवाहाच्या कार्यक्रमांत मात्र या पळवाटा संभवत
नाहींत. म्हणून सहविवाहाशिवाय कोणत्याही समता प्रवर्तक संस्थेचा कार्यक्रम
पुरा होणें शक्य नाहीं.
† पाहा, परिशिष्ट क्रमांक ४४.
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ७ डिसेंबर १९२८.
i ' डब्ल्यू-२०७३-२५ अ