हिंदुंचे धर्मशास्त्र, त्याचे क्षेत्र आणि त्याचे अधिकारी - Page 433

हिंदूंचे धर्मशास्त्र . . . . त्याचे अधिकारी ३८९

श्वेत व पीत या नावाखाली श्रेष्ठ वर्गाच्या लोकांनीं आपापसांत मोठी यादवी केली. पण वडील भांडले म्हणून त्यांचे वंशज कांहीं भांडत नाहीं. हिंदुसमाजांत मात्र अशी पुष्कळ भांडणें पाहावयास सापडतात. याज्ञवल्क्य आणि वैश्यंपायन यांचा पूर्वी कधी काळी कलह झाला असेल. परंतु त्या बद्दल यजुर्वेदी व ऋग्वेदी ब्राह्मण अद्याप तंटे करतात. पेशवाईच्या काळांत ब्राह्मण आणि कायस्थ जातीवर्चस्वासाठीं फार निकरानें भांडले त्याला शंभर अधिक वर्षे झाली पण त्याचे विस्मरण दोहोपैकीं एकाहि जातीला अजून झालेले नाही. वामना नांवाच्या

BLA ब्राह्मणाने आपल्या बलाढ्य अशा बळी! राजाचे राज्य फसवून घेतलें याला

किती तरी वर्षे झाली पण याची आठवण ब्राह्मणेतरांना होते. जातीभेद राहील्यामुळें जातीद्वेषाचा अग्नीहि विझू शकत नाहीं आणि त्यामुळें जातीजातीत तंट्याचा विसर पडण्याऐवजी त्याची आठवण जागृत राहते. जाती भेदामुळें सामाजिक सुधारणेचे काम अशक्य झाले आहे. जातीतील अमुक एक रूढी वाईट आहे हें कोणाला कळत नाही असें नाहीं. पण ती सोडून आपण वागलो तर आपल्याला जातीबाहेर टाकतील मग आपल्या मुला-मुलींची लग्ने कशी होतील, जनन मरण प्रसंगी आपल्या घरीं कोण येईल याचे भय बाळगून जो तो वाईटाला चिटकून राहतो. टनभर बोलणारे पण इंचभर न हालणारे असा जो समाज-सुधारकां विषयी अपवाद उठलेला आहे त्याला कारण जातीभेदच आहे. जातीभेदामुळें हिंदू समाजाची वृद्धी खुंटली आहे व त्याचा क्षय वाढत चालला आहे. हिंदु समाजातील कोणत्याही माणसाला परधर्मांत जाण्यास कांहीं आडकाठी नाहीं. नव्हें हिंदुंच्या दुष्ट अशा अनेक रितीरिवाजामुळें त्यांच्यातलेच कांहीं लोक हिंदु धर्माला कंटाळून परधर्मात जात आहेत. खिस्ती समाज व मुसलमान समाज यांची जी आज वाढ होत असलेली दिसत आहे त्याला कारण हिंदुतले असंतुष्ट लोक त्यांना जाऊन मिळत आहेत हेंच होय. उलट पक्षी परधर्मातले लोक हिंदुधर्मात घेण्यास अवसर नाही. परधर्मातून एकाद्याची शुद्धी करून त्याला हिंदुधर्मात घेण्याचे ठरलें तर आधीं त्याला कोणत्या जातींत घ्यावयाचा हा प्रश्‍न नडतो. कारण जात ही जन्माने प्राप्त होत असते. जो ज्या जातींत जन्मेल ती त्याची जात असा प्रकार हिंदु समाजांत असल्यामुळें नव्या शुद्धीकृत हिंदुला कोणतीच जात पत्करू शकत नाहीं. ज्या समाजात जाती शिवाय गत नाहीं आणि जन्माशिवाय जात नाहीं त्या समाजात कोणीही परधर्माचा माणूस येण्यास धजत नाही. आतल्याला बाहेर जाण्याचा मार्ग हिंदु धर्मानें मोकळा ठेवला आहे पण बाहेरच्याला आंत येण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. या विधीमुळें पाणी आंत घेण्याची तोटी तर बंद पण पाणी सोडण्याची तोटी खुली असलेला हौद जसा शेवटीं तो शुष्क होऊन त्यांत पाण्याचा एक टांकहि

† पाहा, परिशिष्ट क्रमांक ४५.