हिंदुंचे धर्मशास्त्र, त्याचे क्षेत्र आणि त्याचे अधिकारी - Page 435

हिंदूंचे धर्मशास्त्र . . . . त्याचे अधिकारी ३९१

मारला जातो त्या वर्गाच्या कर्तबगारीस समाज अंतरतो व शेवटी गलीत व हतवीर्य असा होतो. बऱ्याचशा लोकांची अशी समजुत असते कीं कनिष्ठ वर्गात कर्तबगार माणसे निपजणे अशक्य आहे व कनिष्ठ वर्गात कर्तबगार माणसे आजवर फारशी निपजली नाहींत ही गोष्ट ते आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ पुढें करतात. पण हे लोक विसरतात की महत्त्वाकांक्षेशिवाय महत्प्रयत्न होऊ शकत नाहीं व महत्प्रयत्न झाल्याशिवाय कोणाच्या हातून महतृकार्य होत नाहीं. कनिष्ठ वर्गात कर्तबगार माणसे निपजत नाहीत याचे कारण त्यांच्यात महत्त्वाकांक्षेचें बीज रूजूं घातलेले नाहीं हेच होय. महत्त्वाकांक्षेचे बीजारोपण सर्वच परिस्थितीत होऊं

शकत नाही. जशी विशेष प्रकारचे पीक येण्यास विशेष प्रकारची जमीन असावी

लागते तसेच महत्त्वाकांक्षेचें बीजारोपण होण्यास विशेषप्रकारची सामाजिक परिस्थिती असावी लागते. जेथे सामाजिक बंधनान्वयें अमक्या वर्गाचा अमूक दर्जा अशी हद्दमर्यादा ठरली गेली आणि अनेक शतकाच्या शिकवणीचा ठसा उमटला म्हणजे त्या दर्जाच्या माणसांना त्या दर्जापलीकडे जाण्याची मानसिक शक्ती उरत नाहीं. मन मारले गेल्यामुळे आपल्या नशीबी मोठा दर्जा प्राप्त नाहीं अशी त्यांची ठाम समजूत होते व मोठेपणा मिळविण्याचा प्रयत्न करावा अशी त्यांना कल्पना देखील होत नाहीं. इतकेंच नव्हें तर आपल्याला घालून दिलेली मर्यादा सोडून वर जाण्याचा प्रयत्न करणें म्हणजे पायरीला पाय लावल्यासारखें अधर्म्य कृत्य करणें होय असें त्यांना वाटतें. खालच्या दर्जाच्या माणसांत मोठी माणसें निपजली नाहींत याचे कारण त्यांच्यांत गुणवान लोक नाहींत असें नाहीं. त्यांच्यात मोठे लोक निपजले नाहींत याला कारण तुमच्या नशीबांत मोठेपणा नाहीं ही हिंदुसमाजाची शिकवण होय. दुसरे कांहीं नाहीं. हिंदुसमाजाच्या या विपरीत शिकवणूकीमुळे स्त्रीशुद्रांच्या गुणास हिंदुसमाज अंतरला आहे. मोठी माणसें ही समाजाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्याशिवाय समाज मोठा होऊ शकत नाहीं. ही मोठी माणसे मिळतील त्या वर्गातून घेतली पाहिजेत. ब्राह्मणांच्या खाणींतून हिरे निघतात आणि शुद्रांच्या खाणीतून सारे कोळसेच निघतात अशा खोट्या समजुतीला हिंदुसमाज बळी पडला आहे. हिंदुसमाजाची काठी मजबुत राहवयाची असेल तर जेथे जेथे म्हणून गुणांचा अंश असेल तेथें तेथें त्याचा पूर्ण विकास होईल अशी व्यवस्था करणें अवश्य आहे.

समाजशास्त्रवेत्ते सांगत आहेत की हिंदुसमाजांत कांहीं वर्गाच्या ठायी कल्पलेली अपवित्रता व अस्पृश्यता यात विचार शून्यतेची परमावधी झाली आहे. अतिशुद्रादिजाती अस्पृश्य आहेत, त्यांचा स्पर्श देखील हिंदुंना खपत नाहीं. पण तेच हिंदू साहेब लोकांच्या येथें जेवणास गेले असतां त्याच अतिशुद्र नोकरांनी तयार