हिंदुंचे धर्मशास्त्र, त्याचे क्षेत्र आणि त्याचे अधिकारी - Page 437

हिंदूंचे धर्मशास्त्र . . . . त्याचे अधिकारी ३९३

नाहीं एवढेच तिनें म्हटलें आहे. या ठरावानें जातीभेद कांहीं मोडत नव्हता; फार तर जातीद्वेष कमी झाला असता. परंतु जाती समान आहेत असें म्हटल्यानें जाती जातींत प्रेम वाढेल व तेणें करून रोटी बेटीचे बंद तुटावयास लागून शेवटीं जातीची माती होऊन हिंदूंची एक जात होईल असें भय वाटून या ठरावासंबंधी ब्राह्मण जातीत दोन पक्ष पडलें. जातीजाती श्रेष्ठ कनिष्ठ नाहीत असें म्हणणाऱ्यांना जुन्या पक्षाचे सनातनी लोक समसमानी अशा मोठ्या क्रांतीकारक व भयप्रदर्शक नांवाने संबोधू लागले व त्यांना नामोहरण करून त्यांचा पाडाव करण्याचा चंग त्यांनी बांधला. या सनातनी ब्राह्मणांनी गेल्या महिन्यांत श्रीक्षेत्र काशी येथें अखिल भारत वर्षीय ब्राह्मण महासंमेलन भरविले. या संमेलनास द्रविड, तामिळ, आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, गुर्जर, बंगाल, कान्यकुब्ज, मैथिल इत्यादि प्रायःसर्वं भरतखंडांतील दोन हजार तज्ज्ञ प्रतिनिधि उपस्थित झाले होते. या संमेलनापुढें एकंदरीत १७ प्रश्‍न चर्चेकरितां मांडण्यांत आले होते. त्या प्रश्‍नांवर दिलेले निर्णय आजच्या अंकांत दुसरीकडे छापण्यात आले आहेत जो कोणी ते निर्णय वाचून पाहील त्यांना ते समसमानी ब्राह्मणांच्या ठरावांच्या कसे विरूद्ध आणि प्रतिगामी स्वरूपाचे आहेत हें दिसून येईल. हे निर्णय देतांना अज्ञ जनांना असें भासविण्यात आले आहे कीं, धर्मशास्त्राच्या अनुज्ञेप्रमाणे आचरण करीत आल्यामुळेच हिंदुसमाज आजपर्यंत तगला आहे. हिंदुसमाज धर्मशास्त्राविरूद्ध जर वागूं लागेल तर त्याच्या बरोबरीचे समाज जसें लयास गेले तसा तोही लयास जाईल हे म्हणणे पुष्कळांना पटले व -> त्यामुळे पुष्कळशा माणसांचा धर्मशास्त्रावरील विश्वास दृढ होतो. पण हे म्हणणें अर्थशून्य आहे हें उघड करून दाखविण्यास फारसा लांबवर विचार करण्याचे प्रयोजन नाही. अत्यंत प्राचीन काळीं उदयास आलेल्या राष्ट्रांपैकी हिंदु राष्ट्र हें एक आहे. ही गोष्ट इतकी महशूर आहे कीं, तिची कोणालाहि आठवण करून देण्याचें कारण नाहीं. त्याच्या बरोबरीची इजीप्त, आसीरीया, रोम व ग्रीस वगैरे राष्ट्रे नामशेष झालीं हेंही खरें आहे. परंतु हिंदु राष्ट्र इतके दिवस जीव धरून राहिलें म्हणून तें बलवान आहे असें म्हणणें आत्मश्लाघेचें तसेंच विचारशून्यतेचें लक्षण आहे असें आम्हास वाटतें. जगण्याच्या अनेक परी आहेत

व त्या सर्वच बलदर्शक अथवा स्वाभिमानदर्शक आहेत असें नाहीं. शत्रुचा हल्ला

आला असतांना त्याचा पराभव करून आपले स्वातंत्र्य कायम राखणें ही जगण्याची एक पर आहे. तसेंच WAP शरण जावून त्याच्या दास्यत्वाखालीं जीवित कंठणें ही देखील जगण्याची दुसरी पर आहे. दोन्ही परीनें जगणें होतेच. परंतु स्वातंत्र्ययुक्त जीवनाच्या परीची सर गुलामगिरीच्या जीवनाच्या परीला कधींहि

† पाहा, परिशिष्ट क्रमांक ४६.