हिंदुंचे धर्मशास्त्र, त्याचे क्षेत्र आणि त्याचे अधिकारी - Page 439

हिंदूंचे धर्मशास्त्र . . . . त्याचे अधिकारी ३९५

व वयानें स्त्री-पुरूष प्रजोत्पादनास तयार झाल्याशिवाय दुनियेंत कोठेंच त्यांची लग्नें होत नाहींत. आमच्या देशांत मात्र विवाहाची वयोमर्यादा आठव्या वर्षाच्या वर नसावी असें आमचे धर्ममार्तंड निर्णय देत आहेत! निरोगी माणसामाणसांत सहभोजन झालें असतां एकमेकास कोणताच रोग होत नाहीं, तसेंच माणसामाणसांत सहविवाह झाला असतांना त्यांच्या पोटी माणसेंच निपजतात अशी अनुभवाची ग्वाही सारे जग देत आहे. आमच्या देशांत मात्र रोटीबंद व बेटीबंद कायम राहिले पाहिजेत अशी शास्त्राची अनुज्ञा असल्याचे आमचे धर्मगुरू सांगत आहेत ! जणूं ब्राह्मणाच्या शेजारी मांग जेवावयास बसला तर त्यास रक्तपिक्ती फुटेल! कां ब्राह्मण स्त्रिया व मांग पुरुषांचा संबंध घडला तर त्यापासून होणारी संतति माणसाची न होतां पशुची होईल! स्त्री व शूद्र यांच्यावरील हीनत्वाचा डाग दुनियेंत कोठेंच उरला नाही. गृहकृत्यांना बांधून टाकलेल्या स्त्रिया वाटेल त्या क्षेत्रांत शिरून वाटेल त्या दर्जावर चढल्या आहेत हें यूरोपातीत कोणत्याहि राष्ट्राच्या सामाजिक घडामोडीकडे पाहिलें असतांना दिसून येईल. नेपोलियनसारखा यतृकिंचित चांभाराचा पोर अर्ध्या यूरोपखंडाचा बादशाह होऊं शकतो. आईबापाचा ठाव नसलेल्या LHS मॅकडोनल्डसारख्या अर्भकाला ब्रिटिश साम्राज्याच्या दोऱ्या दातांत असलेल्या बलाढ्य इंग्लिश राष्ट्राचा मुख्य दिवाण होता येते. एके काळीं सेवक मानलेले शूद्रवर्ग जगात सेव्य होऊन मोठमोठ्या अधिकाराच्या जागास पात्र झालेले आहेत; इतकें जग पुढें गेलें आहे. आमच्या देशांत स्त्री शूद्रांना साध्या प्रणवाचा उच्चार करण्याचा अधिकार नाहीं असें शास्त्रमत नि:शंकपणें मांडण्यांत येत आहे!

या निर्णयांविरूद्ध समसमानी ब्राह्मणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या तर्फे सनातन्यांच्या निषेध प्रदर्शन सभा भरविण्यांत येत आहेत. त्यांच्या साऱ्या कार्यक्रमावर पाणी पडल्यांनें त्यांना संताप येणें साहजिक आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काशीचें संमेलन पद्धतशीर झालें नाहीं. कारण विचारसभेची नियमावली आयत्यावेळी प्रसिद्ध करण्यांत आली व ती पंडीतांच्या अनुमती शिवाय त्यांच्यावर लादली गेली; मध्यस्थ नेमण्यांत वादी प्रतिवादी यांना त्यांच्या लायकी- नालायकी संबंधी मत देण्याचा अधिकार न देता ते नेमण्याचे तसेंच अखेर निर्णय देण्याचे सर्व अधिकार आचार्याकडे देण्यांत आलें होते; तसेंच सर्व धर्मशास्त्र ग्रंथांचे प्रामाण्य मान्य करण्यांत आलें होते. या गोष्टी गैर झाल्या हे समसामान्याचें म्हणणें आम्हासहि मान्य आहे. पण आम्ही असें विचारतो कीं समसमानी ब्राह्मणांना जी पद्धत पसंत होती त्या पद्धतिप्रमाणें काशीच्या संमेलनाचा कार्यक्रम