त्यांच्या माणुसकीचा खून होणार नाही, तसले स्वराज्य त्यास हवे - Page 442

३९८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

उपयोग आपल्या स्वार्थाकरितां केला आणि भटाभिक्षुकांनी धर्माचा आधार घेऊन आपले हक्क आणि अधिकार हे दैवी आहेत असे लोकास भासविले. पद दलित अस्पृश्यवर्ग आज जगास जाहीर करीत आहे की धर्माचे अवलंबन त्यांस डांबून ठेवण्यांत आणि त्यांच्या उन्नतीचा मार्ग खुंटवून टाकण्यांत करण्यांत आले.

२. अध्यक्ष व स्वागताध्यक्ष जरी सामाजिक प्रश्‍नास विसरले नसले तरी त्या प्रश्नास द्यावयास हवें तेवढें महत्त्व देण्यात आले नाही. स्वागताध्यक्षांनी तर सांगून टाकले कीं युवक चळवळ मुख्यत्वेकरून राजकीय अशीच आहे. अध्यक्षांचा कलहि तशाच प्रकारच्या मताकडें झुकलेला दिसत होता. साम्राज्यशाही नेस्तानाबूत करा (Down with Imperialism) या गगनभेदी आरोळीत साम्राज्यशाही ज्या ब्राह्मणशाही (Brahmanism) मुळें हिंदुस्थानांत आपली पाळेंमुळें दृढ करूं शकली तिजकडें साहजिकच दुर्लक्ष करण्यात आलें. ज्या ब्राह्मणशाहीच्या पायावर आजच्या साम्राज्यशाहीचा डोलारा उभारला गेला आहे तो पायाच मुळ खिळखिळा केला तर साम्राज्यशाही नष्ट करणें किती सोपें जाईल हे तरुणांच्या पुढाऱ्यांच्या ध्यानांत आलेले दिसत नाहीं. तरुणांच्या तर नाहींच नाहीं. साम्राज्यशाहीचा जोर व बळकटी ज्या वर्गावर राज्य करण्यात येते त्यांच्या दुर्बलतेमध्येंच असते. हिंदुस्थानची ही दुर्बलता हिंदुंच्या सामाजिक रचनेंतच साठवलेली आहे. आमची सामाजिक नीती, व आमच्या चालीरीती ह्या ऐक्य विध्वंसक आणि विघटणा परिपोषक अशा आहेत. त्यामुळेंच साम्राज्यशाहीला आपलें ठाणें येथें बळकट करितां आले व अजून ते कायम ठेवण्यांस ती समर्थ आहे. तेव्हां. खर्‍या yerais आणि कार्यकर्त्यांस एवढेंच सांगणे आहे कीं ही परिस्थिती जर बदलावयाची असेल तर जन्मजातीजन्य विषमता नष्ट करा, एका चिमुकल्या वर्गाचे बहुजनावर असलेले धार्मिक व सामाजिक वर्चस्व दूर करा, स्त्री व अस्पृश्यवर्गावर पुरातन काळापासून लादलेल्या गुलामगिरीचें उच्चाटन करा, म्हणजे तुमच्या डोक्यावर नाचत असणारे साम्राज्यशाहीचे भूत क्षणार्धात अंतर्धान पावलेंच म्हणून समजा.

३. पुण्यात जमलेल्या तरुणांत येथील सामाजिक परिस्थितीचे ज्ञान विशेष नव्हते. व पुढाऱ्यांत ज्या वर्गाचा भरणा होता त्यास इतर जाती व वर्गाच्या सामाजिक अडचणींचे व हृदयभेदी परंतु छद्मी दु:खाचे आकलन झालेले नव्हते, त्याबद्दल त्यास संवेदना झालेली नव्हती. त्यामुळे सामाजिक प्रश्‍नांची हेळसांड होऊन राजकीय बाबीवरच विशेष जोर देण्यांत आला. नाहीं म्हणावयास अठरा धान्याचे कडबोळेवजा सामाजिक बंडाळीचा ठराव पास करण्यांत आला. ह्या ठरावांत बाल विवाह निषेधापासून ते जातीभेदविध्वंसन व अस्पृश्यता निवारण