त्यांच्या माणुसकीचा खून . . . स्वराज्य त्यास हवे ३९९
पर्यंतच्या सर्व गोष्टींचा समावेश करण्यांत आला आहे. या सामाजिक प्रश्नांनीं एका ठरावाच्या संकुचित कक्षेत इतकी गिचडी करून ठेवली कीं त्यामुळें एकमेकांच्या श्वासोश्वासाचा कोंडमारा होऊन प्राणहानी होण्याचा संभव प्राप्त झाला. ठरावाबरोबरच सामाजिक बंडाळी कशी करावयाची याचा कार्यक्रम परिषदेने आखला असतां तर फारच उत्तम झाले असते. आणि परिषदेच्या पदरांत यशस्तितेचे भरीव श्रेय पदरांत पडले असते. निदान समतासंधी किंवा जात-पात-तोडक कार्यास तरुणांनी जोरानें मदत करावी व त्यात भाग घ्यावा असें जरी सुचविले असते तरी बरेंच कार्य झालें असतें. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ह्या दोघांनीं, तरुणांची वृत्ती क्रांतीकारक झाली पाहिजे असें ठासून सांगितले आहे. त्यांतील सामाजिक क्रांतीकारक भावना वर निर्दिष्ट केलेल्या ठरावान्वये उत्पन्न करण्यांत आली. राजकीय क्रांती भावनोत्तेजक संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव प्रचंड बहुमतानें पास झाला. तसेच ता. १० मे हा १८५७ च्या बंडाच्या स्मरणार्थ स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्यात यावा असेही एकमताने ठरलें. युवकसंघांच्या कार्यकर्त्यानी खादी वापरावी अशा धर्तीचा आर्थिक प्रश्न विषयकही एक ठराव पास झाला. अस्पृश्य वर्गाच्या चष्य्यांतून किंवा खऱ्या सामाजिक क्रांतीवादाच्या दृष्टीने जर या परिषदेकडे बघितले तर ती विशेष यशस्वी झाली असें म्हणता येणार नाहीं. आणि त्याची तशी अपेक्षाही नव्हती. अस्पृश्यवर्गाला सध्यां सामाजिक चळवळीची आवश्यकता आहे. स्पृश्यांचा सामाजिक विषयाबद्दलचा दृष्टीकोन जर बदलला तर तो त्यास हवा आहे. त्यांनी आपली चळवळ जरी स्वावलंबन व आत्मविश्वासाच्या जोरावर चालविलेली असली तरी स्पृश्यांच्या बदलत्या दृष्टीकोनांमुळे त्यांचे कार्य जरा सुलभ होईल एवढेंच.
४. ज्या राष्ट्रीय स्वातंत्र्य व स्वराज्याच्या प्रश्नावर या परिषदेत जोर देण्यात आला आणि ज्याकरिता देशांतील पुढारी तळमळत असून आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत ते स्वराज्य जर स्पृश्य वर्गाचेंच होणार असेल आणि ज्यामुळे आजच्या परिस्थितीकडे लक्ष दिले असता, स्पृश्यांच्या हातीं असलेल्या धार्मिक व सामाजिक सत्तेस राजकीय पाठबळ मिळणार असेल तर तसले स्वराज्य अस्पृश्य वर्गाला अत्यंत अनिष्ट असे होईल असें त्या वर्गातील कांहीं लोकास वाटते. ही अस्पृश्यांची भीती निराधार व निरर्थक आहे, उलट स्वराज्यांत अस्पृश्यतेचा आम्ही समूळ नायनाट चुटकी सरसा करूं असें स्पृश्यांकडून व विशेषतः राष्ट्रीय पुढाऱ्यांकडून भासविण्यांत येते. स्वराज्य पदरांत पडल्याबरोबर
अस्पृश्यतेचा उच्छेद करूं असें म्हणणाऱ्या राष्ट्रीय पुढारी [बुवांना, ] [मद्रासेत ]