हिदुधर्माचा सिद्धांत आणि लोकशाही - Page 449

परिशिष्ट-२
हिंदुधर्माचा सिद्धांत आणि लोकशाही

येथील लोकशाही बलशाली करायची असेल तर तिचा आधार येथील प्राचीन वैचारिक जीवनात शोधला पाहिजे, या दृष्टीने भारतीय लोकशाहीची मुळे याचा शोध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मन घेत असतांना या लोकशाहीचा येथील परंपरेशी, प्राचीन जीवनाशी सांधा जोडण्याचा त्यांचा प्रयत्न सतत सुरू होता. याबाबत विचार करतांना ते म्हणतात, येथील प्राचीन काळातील ब्रह्मवाद लोकशाही तत्त्वज्ञानाचा उत्तम आधार होऊ शकला असता. जुन्या काळातील ब्रह्मवादाची कल्पना खिश्चन, मुस्लिम व ज्यू धर्मातील ईश्वरविषयक कल्पनेपेक्षा किती तरी श्रेष्ठ आहे. या धर्मामध्ये ईश्‍वर हा धर्माचा निर्माता. तो श्रेष्ठ व सर्व माणसे ही त्याची लेकरे अशी कल्पना आहे. यामध्ये निर्माता व माणसे यामध्ये अंतर आहे. द्वैत आहे. परंतु ब्रह्मवादाची कल्पना या विचारापेक्षा मूलतः वेगळी आहे. येथे सर्व माणसे ही ब्रह्माची रूपे आहेत. ब्रह्म

आणि माणसे ही एकच आहेत. त्यांत कसलाही भेद नाही. अद्दैताचीही

कल्पना समतेच्या दृष्टीने अधिक श्रेष्ठ दर्जाची आहे. या ब्रह्मवादातून लोकशाही जीवनाचा वृक्ष चांगला फोफावला असता. परंतु दुर्दैवाने जातिवादाने ब्रह्मवादातील समतेचा विचार मारून टाकला. यासंबंधीचे विवेचन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ' Riddles in Hinduism’ An Exposition to Enlighten the Masses या पुस्तकातील २२ व्या निबंधात । केले आहे.

८.00 e a 020. यल य स कप sn स 20 स्य

1:Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches, Vol. 4, P. p. 284—287.