सत्यशोधक समाज - Page 450

परिशिष्ट-३
सत्यशोधक समाज

महात्मा जोतीराव फुले याँनी खालील ध्येय आणि उद्दिष्ट यावर आधारित सत्यशोधक समाजाची स्थापना केली,

““ ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादी लोकांच्या दास्यत्वापासून शूद्र लोकास मुक्त करण्याकरिता व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे आज हजारो वर्षे ते शूद्र लोकास नीच मानून गफलतीने लुटीत आले आहेत, यास्तव सदुपदेश व विद्याद्वारे त्यास त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता म्हणजे धर्म व व्यवहारासंबंधी ब्राह्मणांचे बनावटी व कार्यसाधक ग्रंथांपासून त्यास मुक्त करण्याकरिता काही सूज्ञ शूद्र मंडळींनी हा समाज तारीख २४ माहे सप्टेंबर १८७३ इसवी रोजी स्थापन केला. या समाजात राजकीय विषयावर बोलणे अजिबात वर्ज्य आहे.” (म. फुले समग्र वाडःमय पाचवी आवृत्ती पृ. १८५)

अवघ्या पंधरा वर्षांत सत्यशोधक समाजाने म. जोतिराव फुले यांच्या नेतृत्वाखाली आपल्या ध्येय व उद्देशानुसार एवढे परिणामकारी कार्य केले की ब्राह्मण समाजाला आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी तारीख १७ जून १८८८ ला “ ब्राह्मण सभा “ स्थापन करावी लागली. याबाबत ' ब्राह्मण सभेची साठ वर्षे ' या ग्रंथात सभेची पार्श्वभूमी विशद करताना वा. रा. गुळवणे म्हणतात, “ जोतीराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने ब्राह्मण समाजावर प्रखर हल्ले सुरू केले होते. वेद, मुर्तीपूजा, चातुर्वर्ण्य आणि पौरोहित्य ही सर्व झुगारून दिली पाहिजेत, किंबहुना त्यामुळे ब्राह्मणेतर समाज अवनतावस्थेला पोहोचला, अशा प्रचाराचा सत्यशोधक समाजाने धुमधडाका सुरू केला. राज्य सत्ता सर्वस्वी इंग्रजांच्या हाती असली तरी कित्येक महत्वाच्या नोकऱ्या पटकावण्यात ब्राह्मण समाजाला यश मिळाल्यामुळे ब्राह्मणेतर संमाजाचा जळफळाट सुरू झाला. महाराष्ट्रात मराठा समाज बहुसंख्य असल्यामुळे त्या समाजाची धार्मिक गुलामगिरी नष्ट झाल्याशिवाय त्यांची उन्नती होणे शक्य नाहीं, अशा मतांचा जोरात प्रचार सुरू झाला. काहीतरी करून ब्राह्मण समाजाचे नाक खाली करावयाचे असा जणू सत्यशोधक समाजाने विडाच उचलला होता, असे म्हणण्यास हरकत नाही.” (खैरमोडे, खंड ५,प. ३३६-३७)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, सत्यशोधक समाजाचे अध्वर्यू जोतीबा फुले यांचे खरे साथीदार व उत्साही शिष्यांपैकी बरेचसे जण ' अनार्य दोषपरिहार मंडळी ' या संस्थेच्या चालकांपैकी होते. एकाच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय