परिशिष्ट-५
नगर येथील पाणी प्रकरण
बाटलेले खिस्ती व ब्राह्मण्यग्रस्त हिंदु यांच्यामधील
एका जुन्या वादाची हकीकत
'' विष्णुपंत यांस कायद्याची बरीच माहीत होती, आणि या माहितीचा ते लोकांच्या कामांत चांगला उपयोग करीत असत. मुंबईपेक्षा नगर प्रांतांतील ख्रिस्ती लोकांस अशा प्रकारचे जे सहाय्य झालें, त्याचा त्यांस लवकर विसर पडणार नाही. जें हिंदु, मुसलमान वैगेरे लोक ख्रिस्ती होतात, त्यांचे पहिले हक्क बुडवायाचा लोक प्रयत्न करितात. अशा प्रसंगी त्यांच्या ज्या खिस्ती बांधवास कायद्याचें ज्ञान आहे, त्यांनी त्यांना सहाय्य करावें हे त्यांचें कर्तव्य आहे. हें सहाय्य विष्णुपंत यांनी मोठ्या धैर्याने केले, म्हणून त्यांची तारीफ करणें योग्य आहे. नगराच्या पाणी प्रकरणाचा विष्णुपंतांच्या चरित्राशी विशेष संबंध आहे. म्हणून त्याची हकीकत थोडी विस्तारांने सांगतो.
हें पाणीप्रकरण सन १८५९ त उपस्थित झाले. त्यांत पुढारी विष्णुपंत होते. ह्या प्रकरणावरुन असे वाद जेव्हा ठिकठिकाणी उत्पन्न होतात, तेव्हां जुने हिंदु लोक व अलीकडील सुशिक्षित लोक व त्यांचे पत्रकर्ते खिस्ती लोकांस दोष देतात, व त्यांवर भलभलत्या हेतूंचा आरोप ठेवितात. म्हणून बहुत लोकांस आतां त्यांचा विसर पडला आहे. यास्तव त्या प्रकरणाची कच्ची हकीकत थोडक्यांत देण्याची आवश्यकता आहे ती पुढच्या लोकांच्या उपयोगी पडेल अशी आशा आहे.
दोष देणारे म्हणतात कीं, असा बखेडा उपस्थित करण्यांचें कांहीच प्रयोजन नव्हतें, खिस्तीलोकांनी तो बळेच उकरून काढीला. हें म्हणणें खरें नाही हें वाचकांच्या ध्यानांत यावें, म्हणून ह्या प्रकरणास मूळ कारण काय झाले तें सांगतों. खिस्तीलोकांस वारंवार पाण्यामुळे फार अडचणी भोगाव्या लागत. अहमदनगर शहरांत मिशनचे दोन तीन बंगले आहेत. त्यापैकी एक बंगल्यांत मात्र एक लहानसे कारंजे होतें. ते कित्येक खिस्ती लोकांच्या घरापासून फार दूर होते, तरी त्यांस तेथेच पाण्याकरितां जावें लागे आणि एखाद्या वेळेस नळ बंद झाला म्हणजे त्यांस मोठे संकट प्राप्त होई. आपल्यास कायद्याप्रमाणे इतर लोकांप्रमाणे पाहिजे त्या सरकारी हौदांतून पाणी घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, हैं त्यांस ठाऊक होते. परंतु हया अधिकाराचा त्यांनी बहुत वर्षे उपभोग घेतला नव्हता; म्हणून लोक दांडगा करुन बखेडा माजवितील, याची त्यांस भीति वाटत असे. तेथील मिशनरीपैकी रे्व्बसा नामे एक साहेब सन १८३९