नगर येथील पाणी प्रकरण बाटलेले ख्रिस्ती व ब्राह्मण्यग्रस्त हिदु यांच्यामधील एका जुन्या वादाची हकीकत - Page 457

नगर येथील पाणी . . . जुन्या वादाची हकीकत ४११

पासून कित्येक वर्षे दिल्ली दरवाज्याबाहेरील बंगल्यांत राहत होता, तेव्हां त्याच्या संबंधांतील खिस्ती बाहेरील व शहरांतील कारंज्यांतून पाणी भरत असत. पण ती वहिवाट मागे पडून आतां सुमारे १५ वर्षे तरी झालीं होतीं. यामुळें त्यांस आपला पूर्वीचा हक्क चालविता येईल किंवा नाहीं, याविषयी संशय वाटत होता. म्हणून त्यांनी या विषयी शोध केला, त्यावरून त्यांस समजलें कीं, आपण आपले कायदेशीर हक्क चालविल्यास हरकत होणार नाहीं. तरी ख्रिस्ती लोक मागे मागेंच घेत असत. ज्यांस ऐपत होती, ते भिस्ती लावीत असत. ही ऐपत सर्वांस नव्हती व आतांहि नाहीं. सन १८५९ साली सप्टेंबर महिन्यांत असें झालें कीं, सरकारी अधिकाऱ्यांनी शहरांतील दरोबस्त भिस्ती धरून त्यांस मोठाले हौद उपसून साफ करण्याच्या कामास लाविलें, व त्यांस तीन चार दिवस सोडिलें नाहीं. यावरून भिस्त्यापासून पाणी घेणाऱ्या लोकांस फार अडचण पडली. तेव्हां विष्णुपंत हे गुलाम अल्लीच्या बंगल्यांत रहात होते. त्यांनी एक दिवस कशी तरी

अडचण सोसिली. मग ता. १५ माहे मजकूर रोजीं ते आपल्या कुटुंबास व आणखी एका दोघां ख्रिस्ती मित्रांस बरोबर घेऊन नव्या पेठेतील हौदावर गेले.

सारजाबाई इतर बायांप्रमाणे एक घागर भरून घरी गेली तेव्हां तिजकडे कोणाचे लक्ष गेलें नाहीं. मग ती दुसरी घागर घेऊन चालली, तेव्हां कोणी हिंदु बायांनी पाहिलें; पण हिने ही घागर कोठून भरून आणिली, हें त्यांस समजेना. कोणीकोणी अनुमान केलें कीं, नव्या पेठेंतील हौदांतूनच आणिली असेल. म्हणून त्या जेथल्या तेथेंच थबकून तिची पुनः येण्याची वाट पाहात उभ्या राहिल्या. त्यांतून कोणी रिकाम्या घागरी घेऊन हौदाकडे चालल्या होत्या, त्यांस वाटलें की जर, ही किरस्तावाची बाई कारंज्याला शिवली असेल, तर त्यांचे पाणी आणून काय उपयोग ! ज्या घागरी भरून आपल्या घरांस चालल्या होत्या, त्यांस वाटलें कीं, जर हिनें त्याच कारंज्यांतून पाणीं घेतलें असेल तर हें “ बाटलें “ आणि बाटलेलें पाणी घरांत कसें न्यावे. परंतु बाटलें नसलें तर उगीच कशाला टाकून द्यावे ? म्हणून ती ख्रिस्ती बाई फिरून येऊन कोणीकडे जाते, व कोठून पाणी आणते, हे पाहण्यासाठी ठिकठिकाणीं त्यांचे थवे उभें राहिले होते. कांहीं वेळांनें सारजाबाई तिसरी खेप नेण्यास आली, तेव्हा सर्व बायका तिच्या मागें मागें चालल्यां, हौदाजवळहि बरेच पुरुष व स्त्रिया उभी राहून त्याच गोष्टी विषयीं कुजबुज करीत होते. कोणी कारंज्याला शिवेनात, जसे जणूं कारंजे त्यांस डसेल या प्रमाणे भिऊन त्यापासून दूर उभी राहिलीं होती. जेव्हां त्यांनी सारजाबाईस पाहिले तेव्हां ते म्हणाले “ ती पहा आली ; तिला पाणी घेऊ देऊ नका. “ पण जेव्हां ती आली, तेव्हां कोणी हिंदू पुढें व्हावयास धजेना; पण एक मुसलमान आडवा होऊन तिला हरकत करु लागला. इतक्यांत विष्णुपंत व