नगर येथील पाणी प्रकरण बाटलेले ख्रिस्ती व ब्राह्मण्यग्रस्त हिदु यांच्यामधील एका जुन्या वादाची हकीकत - Page 458

४१२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

त्यांचे मित्र येऊन, त्यां मुसलमानास हरकत करण्यांचें कारण विचारू लागले. त्याशीं कांही बोलणें झाल्यावर तो मनुष्य कुंठीत झाला, आणि दुसऱ्या मुसलमानांनीही त्याला फजित केलें. त्यावरून तो म्हणाला, “ खरेंच, आपण कशाला ह्या लचांडांत पडावें ? आम्हा मुसलमानांस बाटवावयाचें काय भय ? बिस्मिल्ला म्हटलें की सर्व कांही शुद्ध होतें. असें म्हणून तो आपला हांडा भरून चालता झाला. नंतर हिंदुंशीं व मुख्यत्वेंकरून ब्राह्मणांशी तसेंच बोलणें झालें ; पण ह्या उघड गोष्टीविषयीं त्यांची समजूत होईना. ते फार संतापले, आणि त्यांनी लोकांस सांगितलें, कीं, हा हौद लोकांनी भ्रष्ट केला म्हणून याचें पाणी कोणी भरूं नये. यावरून लोकांनी तो हौद टाकून दिला. भटांनी बाजारांत जाऊन सर्वात असें प्रसिद्ध केलें कीं, पाद्रीकडील बायांनी एका बाटलेल्या महारणीकडून कारंजाचे पाणी भरवून व त्यांत गुळण्या टाकवून तें बाटविलें, आणि याचप्रमाणें शहरांतील दरोबस्त हौद भ्रष्ट करण्याची प्रतिज्ञा केली आहे. यारतव सर्व बाजार बंद करून हरताळ पाडा, म्हणजे सरकारचे डोळे उघडून आपली दाद लागेल, ही भयंकर कुभांडी वार्ता एकून बाजारच्या लोकांस फार वाईट वाटलें. परंतु हरताळ पाडण्याविषयीं भटांनी पराकाष्ठेचा आग्रह केला, तरी फार थोडक्या लोकांनी आपली दुकाने बंद केलीं.

नंतर लोकांनी नगरचे मॅजिस्ट्रेट मि. टैटलर यांजकडे अर्ज केला. त्यांतील मतलब असा कीं, पाद्रीकडील लोकांपैकी विष्णु भास्कर व शाहू दाजी कुकडे यांनीं बाप्तिस्मा घेतलेल्या महारणीकडून हौद बाटविला. त्या लोकांस सरकारनें दोन हौद दिले असून तेथेच सर्व खिस्ती लोकांची वस्ती आहे. दुसऱया हौदावर पाणी घेण्याची त्यांची वहिवाट नाहीं. सन १८२८ चा कायदा १७, कलम १, रकम १ ली, तारीख १ नोव्हेंबर सन १८५८ च्या महाराणी साहेबांच्या जाहीर नाम्यांचें कलम ७ वें, यांविरूद्ध चालून तें आम्हांस दुःख देत आहे. यास्तव त्यांस पाणी भरण्याची सक्त मनाई करावी. या अर्जावर ४३२ सहया होत्या. त्या मुख्यत्वेकरून भिक्षुक, कांहीं उदमी, व बाकी पोरें यांच्या होत्या. मॅजिस्ट्रेट साहेबांनी विष्णुपंत व मि. शाहु दाजी यांस बोलावून आणून व अर्ज वांचून दाखवून जबाब विचारला, तेव्हा विष्णुपंत यांनीं सांगितलें कीं, “ कविजंगाचा वाडा भाड्याने घेतल्यापूर्वी आमचे खिस्ती लोक ब्राह्मण वगैरे हिंदु, व दुसरे लोक, यांजबरोबर पाणी भरत असत. सदरहू वाडा घेतल्यावर बहुतेक खिस्ती त्यांतच राहून तेथील हौदाचें पाणीं घेऊ लागले. दुसऱया कारंज्यावर जाण्याची जरूरी पडली नाहीं, पण आतां आमचे लोक शहरांत निरनिराळ्या ठिकाणीं घरें घेऊन रहातात, म्हणून तो वाडा त्यांस फार लांब पडतो. यामुळें आमच्या घरांजवळील हौदाचें पाणी घेण्याची जरूर पडली. आमची, पूर्वीची पाणी भरण्याची वहिवाट कोणत्याही