नगर येथील पाणी . . . जुन्या वादाची हकीकत ४१३
कारणानें बुडूं शकत नाहीं, व सरकारचा कायदाहि असा नाहीं. wary हौदांतून पाणी भरिलें तिचाहि पूर्वीपासून हक्क आहे ; कारण अर्जात लिहिल्याप्रमाणे ती महारीण नव्हती, पण मराठीण ah.” हें ऐकून मॅजिस्ट्रेट साहेबांनी म्हटलें तुमचें म्हणणें बरोबर आहे, तुम्हांस मनाई करण्याविषयी आम्हांस कांही आधार नाहीं, मग त्यानीं अर्जदारांस सांगितलें कीं, “ सन १८५० च्या २१ व्या कायद्यांत साफ सांगितलें आहे कीं, जर कोणी धर्मांतर केलें, तर त्याचें पूर्वीचे हक्क मिळावे. “ त्यावर अर्जदार बोलले कीं, “ हक्क म्हणजे जिंदगी, उत्पन्न, व वतनदारी, या संबंधीं समजावयाचें; पाणी भरण्याचा हक्क मोठा आहे.” शेवटीं त्यांस सांगितलें कीं, “ आम्ही मुंबईस सरकारकडे लिहून पाठवूं आणि तिकडून उत्तर आल्यावर तुमच्या अर्जाचा काय तो जबाब देऊ. "'
इकडे नव्या पेठेतील हौद लोकांनी टाकल्यावर तो वरून उचंबळून चालला, तरी त्यांतून कोणी पाणी घेईनात, आणि तो आता आपल्या उपयोगी नाहीं, म्हणून तो स्वच्छ राहूं द्यावा, याचीही कोणाला जरूर वाटेना. खिस्ती लोकांनी त्यांतून ता. १५/१६ असे दोनच दिवस पाणी घेतलें. पुढें त्यांत लोक शेण कालवीत, कचरा टाकीत, qÒ घंगाळांत खळबळावें त्या प्रमाणे धोतरें व लुगडी त्यांत खळबळीत, बैल व घोडीं यास तोंड घालून पाणी प्यावयास लावीत, फार काय सांगावें ! मुलांस कांठावर जमवून त्यांकडून आंतील पाण्यांत लघुशंका करवीत. त्यांतून एक दोन प्रकार तर खिस्ती लोकांनी प्रत्यक्ष पाहिले. हिंदु लोकांनी अशा रीतीनें पाणी घाणेरडें करून कारंजे बाटविले, तेव्हां अर्थात खिस्ती लोकांसही त्याचा त्याग करून दुसऱ्या हौदावर जाणें प्राप्त झाले. यावेळेस ते नव्या कारंजावर गेले. तेव्हां तेथे लोकांची फार मोठी गर्दी जमली होती. तेथें खिस्ती लोक आले. तेव्हां पोलीस पलटणीचे कुमेदान (कमान्दन्त) यांनी तेथे हजर राहून चांगला बंदोबस्त ठेविला म्हणून बरें झालें. नाहींतर त्या अनिवार लोकांनी अनर्थ करून खिस्ती लोकांस आपला कायदेशीर हक्क चालवूं दिला नसतां. हें नवें कारंजे पहिल्या हौदापेक्षा फार मोठें आहे. हेंहि ख्रिस्ती लोकांच्या स्पर्शाने बाटले असें म्हणून लोकांनीं टाकून दिलें, व त्याच्याहि पाण्याची घाण केली. नंतर विष्णुपंताच्या घराच्या पश्चिमेस कांही अंतरावर चौपटीचें कारंजे आहे, त्याचें पाणी त्यांनीं घेतलें. तेव्हां तेथे लोक फार जमलें नव्हतें, तरी पोलिसचे लोक बंदोबस्ताकरितां आले नव्हतें, म्हणून साळी, कोष्टी, रंगारी, वगैरे २५/३० दांडग्या लोकांनी एका खिस्ती तरूणास मारहाण केली. पुढें याबद्दल फौजदाराकडें फिर्याद झाली. पोलिसांच्या लोकांनी गुन्हेगारांचा पुष्कळ तपास केला, पण फिर्यादी यास गुन्हेगार ओळखून दाखवितां येईनात. नंतर मॅजिस्ट्रेट साहेबांनी पुन्हा चांगला शोध करण्याचा हुकूम केल्यावरून पोलिसाने