४१४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
फिरून तपास करून १६/१७ ATS धरिली. त्यांची चौकशी करून रा. ब. रामचंद्र अमृत दुगल यांनी त्यापैकी बारा जणास पन्नास पन्नास व एकास ७५ रुपये दंड केला. माळीवाड्यांतील लोकांस वाटलें कीं, ख्रिस्ती लोक आपल्याहि कारंज्यावर येतीलच, पण त्यांस येऊं देऊं नये. म्हणून त्यांच्यापैकी शें दोनशे दांडगे गडी हाती सोटेबडगे घेऊन कारंज्याजवळ दररोज पाळीपाळींनें पहारा करीत, आणि पाण्यास ख्रिस्ती बाया आल्यास त्यास मारण्याकरितां दोन अडीचशे दांडग्या बायका कारंजाच्या कांठी चौफेर वेढा घालून उभ्या रहात. या प्रमाणें कित्येक दिवस गेल्यावर ते थकलें. त्यानंतर कांही काळाने बुरूड आळीजवळ रहाणाऱ्या कांही ख्रिस्ती लोकांनी त्या कारंज्याचें पाणी घेतलें, यापेक्षा जास्ती कारंज्यावर ख्रिस्ती लोक जमावाने गेले नाहीत. असो.
ख्रिस्ती लोकांस पाणी भरण्याची मनाई करावी म्हणून शहरच्या लोकांनी केलेला अर्ज व त्या संबंधी प्रकरण मॅजिस्ट्रेट साहेबांनी मुंबईस पाठविलें होतें, त्याचें उत्तर. लॉर्ड एल्फिन्स्टन साहेब गव्हर्नर यांजकडून आल्यावर मॅजिस्ट्रेट साहेबांनी लोकांस त्यांच्या अर्जाचा जबाब दिला तो येणेप्रमाणे--“ज्या लोकांस धर्मातर करण्याच्या पूर्वी पाणी घेण्याचा पूर्ण हक्क होता, त्यांचा तो हक्क किंवा दुसरा कोणताही हक्क ख्रिस्ती झाल्यानें बुडाला नाहीं, उलटे पुर्वीचें दरोबस्त हक्क त्यांचे त्यांस खचित मिळावे असा कायदा आहे. हा कायदा पूर्ण अंमलांत आणला जाईल आणि जे त्यास हरकत करतील त्यास शिक्षा करण्यांत येईल. मुंबईत व दुसऱ्या बहुत ठिकाणी मुसलमान व हिंदु लोकांबरोबर खिश्चन लोकांस प्रसिद्ध तलावांत व विहिरीत पाणी भरण्याची मोकळीक आहे. नगरांतील कारंजावर गुरें, घोडी, गाढवे, कसबिणी, इत्यादिकांस पाणी मिळतें ; परंतु ज्या लोकांच्या संभावितपणाविरुद्ध बोलावयास कोणास कांही जागा नाही, त्यांस हा हक्क मिळूं देऊं नये असा अर्जदारांचा हेतु आहे. “
हा हुकूम अर्थातच लोकांस आवडला नाही म्हणून त्यांनी गव्हर्नर साहेबांस व त्यांचे कौन्सिल यांस अर्ज केला, त्यावरून मुंबई सरकारनें ठराव केला तो असा :--
““ जुडिशियल खात्यापैकी ठराव नं. ३, ४३९, ता. २४ वी माहे आक्टोबर सन १८५९,—माजिस्ट्रेट साहेबांस असें फर्मविण्यांत येतें कीं, आनंदराव बाबाजी देशपांडे यास कळवावें कीं तुम्ही व अहमदनगरांतील दुसऱ्या कित्येक बहकलेल्या लोकांनी अर्ज केला त्यांतील मागणें इतकें गैरसमजुतीचे व बेअदबीचे आहे कीं, सरकार तें एक क्षणभर मनावर घेणार नाहीं. अर्जदारास सांगावें कीं, नगरांतील ज्या कारंज्याविषयी तुम्ही तक्रार करिता, ती मुसलमान राजांनी बांधिली, यांस