नगर येथील पाणी . . . जुन्या वादाची हकीकत ४१७
दुसऱ्या कित्येक ठिकाणी लोकांनी खिस्ती लोकांस पाणी भरण्यास हरकत करून कोठें कोठें तर त्यास फार मार देखील दिला ; परंतु त्या सर्व खटल्यांचें निकाल खिस्ती लोकांच्याच वतीनें होऊन त्यांतील कित्येक गुन्हेगारांस जबर दंड किंवा सक्त मजुरीच्या कैदेच्या जबर शिक्षाहि झाल्या. पुणें, सातारा, सोलापूर वगैरे परजिल्ह्यांमध्येहि कित्येक ठिकाणच्या लोकांनी असेच बखेडे केलें, अजून चालविले आहेत, तथापि त्यांतील एकांत देखील न्यायाचा पराजय होऊन जुलुमाचा जय झाला नाही. यावरून आम्हां सर्व खिस्ती लोकांनी मंडळीचा मस्तक जो प्रभु त्याची उपकारस्तुति केली पाहिजे.
सदरील हकिकत बरीच लांबली, तरी बहुत गोष्टी सोडून तिचा संक्षेप केला
आहे. त्या गोष्टी आणि लोकांचे म्हणणें, हरकती, प्रमाणें कृयुक्ती, व त्यांस खिस्ती पक्षाकडून काय उत्तरें मिळाली, कृष्णपक्षाच्या कृयुक्ती ईश्वराने कशा व्यर्थ केल्या, हें सर्व ज्यास वाचावयाचें असेल, त्यांनी त्यावेळच्या ज्ञानोदयांतील सविस्तर पत्रव्यवहार वगैरे वाचून पहावें. (वरील उतारा रेव्हरंड विष्णू भास्कर करमरकर यांचे चरित्र पृष्ठ ३७ ते ५० यांतून घेतला आहे.)
सं. ब. भा.
७७७
बहिष्कृत भारत: ६ मे १९२७.