पेशवाई - Page 469

पेशवाई ४२३

बंडाला प्रवृत्त होण्यास तिळभरही वाव मिळू नये. या ऐतिहासिक घटनांचे ऐतिहासिक ठसे म्हणजे महारांना कोकणातील गावांत फार मानाचे व महत्त्वाचे स्थान देण्यात आले. ते हजारो वर्षे टिकून राहिलेले आहे. महारांना दिलेले 'भूमिपुत्र' हे नाव कोकणात चालू आहे. गावची देवस्की महारांच्याच हातून पुरी करण्यात येते. महारांनी देवदेवतेला हाका मारून जागे करावे लागते. त्यांची काठी बसल्याशिवाय देवदेवतांच्या अंगात देवपण येत नाही. देवचार' म्हणून एक देवता कोकणात आहे. तिला शांत करण्यासाठी जो विधी करावा लागतो तो महाराला घोंगडी व अन्न दिल्याशिवाय पुरा होत नाही, आणि देवता संतुष्ट होत नाही. गावातील देवदेवतांपुढे गाऱ्हाणे घालावयाचे असले तर मराठे वगैरे स्पृश्य गावकऱ्यांना महारापुढे दाती तृण धरून विनवण्या कराव्या लागतात. आणि महारांनी देवदेवतांपुढे गाऱ्हाणी घातली तरच देवदेवता नवसाला पावतात, असा हजारो वर्षांचा रिवाज आहे. यावर सुशिक्षित व अशिक्षित कोकणस्थांचा विश्वास आहे." १

““ पुना ऑब्झर्वर अँड सिव्हिल अँड मिलिटरी जर्नल “ या पत्रात शुक्रवार,

तारीख १८ डिसेंबर १ ९०३ रोजी ‘ The Condition of the Mahars ° या शीर्षकाखाली एक अग्रलेख आलेला होता. त्यातही हेच प्रामुख्याने सांगितले होते की, पददलित दशेत दिवस काढणारे आजचे महार यांचे पूर्वज एकेकाळी राज्यकर्ते होते :

“ According to Baden-Powell, the term “ Maharashtra ” is derived from the fact of the Mahar domination of Western India. This may or may not be true, hut there is sufficent evidence to warrant the conclusion that they were once a people with their own king, their own laws, religion and social customs. In appearance they are able-bodied and muscular, many of them handsome, intelligent and quick to assimilate and possessing physical courage. Their women, many of them could have some pretensions to fine features and graceful forms, like the men can turn their hand to anything. ” (The Life of Shivram Janba Kamble, p. 141.)”?

१; उद्धृत, खैरमोडे, खंड ३ रा ; पृ. १५.

२: उद्धृत, खैरमोडे, खंड १ ला ; पृ. ५-६.