कोरेगावचा जयस्तंभ - Page 470

परिशिष्ट-९
कोरेगावचा जयस्तंभ

' इंग्रजी अंमल हिंदुस्थानात सुरू करण्यास हिंदु लोकांनी इंग्रजांना जी मदत केली होती तिच्या अनेक पट मदत अस्पृश्यांनी केलेली होती. इंग्रजांच्या पलटणींपैकी बऱ्याच पलटणी अस्पृश्यांच्या होत्या. अर्काटच्या वेढ्यात अस्पृश्य शिपायांनी भाताचे पाणी पिऊन व इंग्रज शिपायांना भात खाण्यास देऊन अर्काटचा वेढा चार दिवस लढविला व किल्ला इंग्रजांना मिळवून दिला. मुंबईत ज्या पलटणी होत्या त्यांत महारांचा बराच भरणा असे. पेशवाईला धुळीस मिळविण्यास महार सैनिकांचा पहिला टोला कारणीभूत झाला. ता. १ जानेवारी १८१८ रोजी मुंबईचे नेटिव्ह इन्फ्रंट्रीतील ५०० लोक केवळ २५० बेशिस्त घोडेस्वार व २ तोफा (या मद्रासच्या २४ गोऱ्या गोलंदाजांच्या ताब्यात होत्या.) एवढ्या अल्प सैन्याच्या जोरावर कॅप्टन स्टॉटन (Staunton) याने पेशव्यांच्या २५,००० हून अधिक अशा प्रचंड सैन्याला तोंड देऊन कोरेगावचे जे रक्षण केले ते खरोखरच संस्मरणीय होय. यावेळी इंग्रजांच्या बाजूचे फक्त २७६ लोक पडले. सुप्रसिद्ध इतिहासकारक टॉड्‌ या प्रसंगाचे हिंदी थॅर्मापिली असे वर्णन करतो. सदर विजयाच्या स्मरणार्थ कोरेगाव येथे एक दगडी विजयस्तंभ उभारण्यात आला आहे.' (-निबंधमाला, पा. १०७८). मुंबईची नेटिव्ह इन्फंट्री म्हणजे महार पायदळांची पलटण होय. महार सैनिकांनी पेशवाईला धुळीस मिळविले, याबद्दलचा कबुलीजबाब मध्य भागाचे कमिशनर मि. एल. जे. माऊटफोर्ड यांनी अस्पृश्यांच्या

VARTA ठरावावर मुंबई कायदे कौन्सिलात ५ नोव्हेंबर १९२० रोजी भाषण

करताना दिलेला आहे. त्यांच्या भाषणाचा सारांश येणेप्रमाणे :

जॉन कंपनीचे जे सैन्य होते त्या सैन्यात महार लोकांचा बराचसा मोठा भरणा होता. कोरेगावला जो जयस्तंभ उभारलेला आहे तो महारांनी गाजविलेल्या पराक्रमाचे जयचिन्ह होय. पौवात्य देशात जे पराक्रमाचे प्रकार आतापर्यंत समजले जातात त्यात्‌ कोरेगावचा महार पराक्रम सर्वश्रेष्ठ होय. खडकीची लढाई संपल्यानंतर कॅप्टन स्टाँटन हा कर्नल बर याला पुण्याजवळ ससैन्य मिळण्यासाठी खडकीहून निघाला व तो कोरेगावला थांबला. त्याचे पायदळ ८०० शिपायांचे होते. त्यात थोडे अरब होते. बाकीचे सर्व महार होते. अरब तोफखान्यावर होते. दुसरा बाजीराव याच्या नेतृत्वाखाली पेशव्यांचे सैन्य त्या बाजूला होते. त्याची व स्टाँटनच्या पायदळाची गाठ पडली. पेशव्याचे सैन्य