मनोगत - Page 47

मनोगत ३

हे उदात्त विचार व अनुदार आचार यांची सांगड घालणारे धर्मशास्त्रकार झिंगले होते असे वाटते; कारण सचेतन व तशीच अचेतन वस्तू हीं सारीं sara रूपें आहेत असे उपदेशिणाऱ्या तत्त्ववादीयांच्या आचारात विलक्षण विषमता दिसावी हे काही शुद्धीवर असणारांचे लक्षण नव्हे !

वेडेवाकडे कसेही असो. पण या धर्मशास्त्राची छाप लोकांवर काही कमी नाही. आपण होऊन अज्ञजन आपल्या हितशत्रूंस भूदेव म्हणून भजत आहेत हे कोण कबूल करील ? विघातक धर्मभावनेच्या शृंखलेने जखडून घेऊन, शत्रूंस मित्र समजून, तयांच्या पायी इतरेजन लीन कां झाले याचा उलगडा करावयास फार दूर जावयास नको.

अज्ञानी लोकांकडून काहीही करविता येईल ; आणि म्हणूनच ज्ञानसंचय--प्रसार नव्हे-ही ब्राह्मणांची मिरास, हे एक धर्माचे मोठे तत्त्व होऊन राहिलेले आहे. तिची महारकी मिळविण्याचे पातक इतरांनी करुं नये असे बजावीत असताही चोरून-छपून ज्ञान मिळवून जज्ञान झाल्यावर पूर्वापार चालत आलेले आचार विचार सोडल्यास स्वच्छंदाने लिहिलेले हे विघातक धर्मशास्त्र तरवारीच्या जोरावर अशा अधर्मीय (?) ब्राह्मणेतरांच्या माथी मारल्याची उदाहरणे ब्राह्मणी अमदानीत कांही कमी नाहींत.

सत्ता व ज्ञान नसल्यामुळे ब्राह्मणेतर मागासले, व त्यांची उन्नती खुंटली हे निर्विवाद आहे ; परंतु त्यांच्या दुःखात दारिद्र्याची तरी भर पडली नाही. कारण शेती, व्यापार-उदीम अथवा नोकरी करून आपला चरितार्थ चालविणें त्यांना दुरापास्त नाही. पण या सामाजिक विषमतेचा बहिष्कृत समाजावर झालेला परिणाम अति घोर आहे. दौर्बल्य, दारिक्र्य व अज्ञान या त्रिवेणीसंगमात हा अफाट बहिष्कृत समाज वाहवला असला पाहिजे हे खास !

दीर्घकाळ अंगी मुरलेल्या दास्यामुळे उद्भवलेली हीनता त्यांना मागे wala आहे. आहे ती स्थिती योग्य आहे, यापेक्षा बरी स्थिती आपल्या नशिबी नाही; अशा समजुतीचा विघातकपणा ह्या पतितांच्या नजरेस आणण्यास ज्ञानासारखे अंजनच नाही. पण ते अजुनही मिरची-मसाल्यासारखे विकत घ्यावे लागत आहे ; आणि दारिद्र्यामुळे ते दुर्मिळ झाले आहे. कोठे कोठे तर विकत घेऊ गेले असता ते मिळतही नाही. कारण ज्ञानमंदिरात सर्वच अस्पृश्यांचा प्रवेश होतो असें नाही.

दारिद्र्याची बोळवण करण्यास कपाळी अस्पृश्यतेचा शिक्का मारला असल्यामुळे पैका मिळविण्यास हवी तेवढी संधी किंवा मोकळीकही नाही. व्यापार-उदीम इत्यादी धंद्यांत त्यांचा क्वचितच रिघाव होतो. नशिब (अजमावून) पाहाण्यास