मनोगत - Page 48

४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

कोठेच जागा नसल्यामुळे त्यांना केवळ भुईचे खडे खात पडावे लागत आहे. अशा या अस्पृश्य. नव्हे बहिष्कृत लोकांस निश्‍चितपणे खितपत पडलेले पाहून ३३ कोटी देवांस--नव्हे, ते हिंदूंचे देव--निदान अल्लास तरी कीव येत असेल. पण मनुष्यकोटीतील इतर प्राण्यांस त्यांच्याबद्दल बहुधा धिक्कारच उत्पन्न होईल. कारण माणुसकीदेखील हिरावून नेली असता जे लोक ती जिंकण्याचा प्रयत्न करीत नाहीत, ती माणसे नसून जंतूच आहेत असे म्हणावे लागते.

पण कोंडीत सापडलेल्या माणसांनी जंतुप्रमाणे राहिल्याशिवाय कसे चालेल ? असे म्हणणारे प्राप्तस्थितिप्रियलोक बहिष्कृत समाजात नाहीत असे नाही, दारिक्र्यामुळे ज्ञान नाही, ज्ञान नसल्यामुळे बल नाही. युक्तिवाद खरा आहे, पण तो लढविणारांच्या माणुसकीला कमीपणा आणणारा आहे हे विसरता कामा नये. कांडी फोडली तरच माणुसकी. अशा माणुसकीचा संचार बहिष्कृत समाजात होत आहे, हे सुचिन्हच म्हणावयाचे. प्रचलित हिंदुधर्माच्या अतिघोर अन्यायास्तव आपल्या समाजास अस्पृश्य मानण्याचे महापातक, विश्वजनक प्रभूला न जुमानता करणारे कोट्यावधी अविवेकी व दुराग्रही जन, जोपर्यन्त या देशात वावरत आहेत ; तोपर्यन्त आपला समाज निकृष्ट स्थितीमध्येच खितपत रहाणार आहे, याची जाणीव या बहिष्कृत समाजातील लोकांस बऱ्याच अंशीं झाली आहे, असें म्हणण्यास प्रत्यवाय नाही.

तसेच परस्थ सरकारास आपल्या तंत्राप्रमाणे वागावे लागत आहे, याचा फायदा घेऊन, अस्पृश्य वर्गाच्या खऱ्या स्थितीविषयी वरिष्ठ हिंदूकडून त्याचा गैरसमज कसा करण्यात येत आहे हे देखील त्यांना कळून चुकले आहे. जातीभेद आणि जातीमत्सर यांनी ग्रस्त झालेल्या देशात खरे स्वराज्य नांदण्यास या बहिष्कृत वर्गास त्यांच्या स्वतंत्र प्रतिनिधींतफे राजकीय सत्तेचा पुरेसा भाग मिळावा या मागणीस त्यांच्या वरिष्ठांनी कसून केलेल्या विरोधाच्या खोडसाळपणाबद्दल बहिष्कृत वर्गाने तक्रार केली आहे. एवंच, राजकीय सत्ता मिळून तिच्या जोरावर सामाजिक विषमतेचे दडपण कायम करू पाहाणाऱ्यांचा कावा बहिष्कृत समाजाने

ओळखला आहे, ही त्यांच्यात उपजलेल्या जागृतीची साक्ष होय.

आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास, तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहाळून पाहिलें असता असें दिसून