कोरेगावचा जयस्तंभ ४२५
२५,००० होते. महार सैनिकांनी पेशव्यांच्या २५,००० लोकांना एक दिवस व एक रात्र जागच्या जागी थोपवून धरले. त्याला पुढे सरकू दिले नाही. शेवटी महार सैनिकांनी पेशव्यांच्या २५,००० सैनिकांचा धुव्वा उडवून दिला. महार हा कोणत्या दर्जाचा लढवय्या आहे याचा हा एक ऐतिहासिक पुरावा आहे. या लढवैय्येपणाबद्दल मुंबई सरकारला व हिंदुस्थान सरकारला महारांबद्दल अभिमान वाटतो व साम्राज्य सरकारच्या सैन्याची वाढ करण्याची वेळ येईल व गरज भासेल तेव्हा सरकार महारांची सैन्यभरती जरूर करेल.
(The Joint Memorandum of the Depressed India-Association, Bombay, and the Servants of Somavanshi Society, Bombay; presented to the Royal Statutory Commission, 1927-29, page 1) *
कोरेगाव येथे झालेल्या युद्धाचे सविस्तर वर्णन खालीलप्रमाणे.-
कोरेगाव युद्ध-' दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांचे मैत्रीचे संबंध फार दिवस टिकले नाहीत. त्यांच्यातील वैमनस्य कांही काळ धुमसत राहिले, आणि शेवटी १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये त्याचा स्फोट झाला. पेशव्यांच्या सैन्याने इंग्रजांच्या पुण्यातील वकिलातीवर जेव्हा हल्ला केला तेव्हा वकिलातीचे संरक्षण करण्यात कर्नल बर यांनी खूप प्रयत्न केले पण पेशव्यांच्या प्रचंड सेनेपुढे प्रथम त्यांचे प्रयत्न निष्फळ झाले. नंतर इंग्रजांच्या माऱ्यापुढे पेशव्याचे सैन्य पुण्याच्या उत्तर दिशेकडे पळून गेले. बाजीरावाने सैन्याची नीट जमवाजमव करून पुनः एकदा कर्नल बर याच्या सैन्यावर (पुण्यातील इंग्रज वकिलातीवर) हल्ला
oa. यावेळी सेकंड बटालियन फर्सट रेजिमेंट बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री, हिचा
मुक्काम पुण्याच्या वायव्येस ३८ मैलावर असलेल्या शिरुर गांवात होता. तिचा प्रमुख कॅप्टन फ्रान्सिस स्टाँटन हा होता. कर्नल बरला, पेशव्यांच्या प्रचंड सैन्याला दुसऱ्यांदा तोंड देणे अशक्य वाटल्यामुळे त्याने कॅप्टन [स्टाँटनला ] पुण्याच्या वकिलातीच्या संरक्षणाकरता मदतीस येण्याबद्दल [तातडीने ] [संदेश ] पाठविला. कॅप्टन tied शिरुरहून पुण्याकडे जाण्यास सेकंड बटालियनला घेऊन ३१ डिसेंबर १८१७ ला रात्रौ ८ वाजता निघाला. हिच्यात बहुसंख्य सैनिक महार होते. कॅप्टन स्टॉँटनबरोबर yoo [पायदळ, ] [३०० ] [घोडदळ, ] ५ बटालियन ऑफिसर्स, २०६ पौंऊडर तोफा आणि त्या चालविणारे २४ ब्रिटिश सैनिक, एवढा लवाजमा होता. सुमारे २५ मैलाचा रात्री प्रवास केला. त्यानंतर ही बटालियन पहाटेस भीमा नदीच्या तीरावर आली. तेव्हा पेशव्यांचे प्रचंड सैन्य नदीच्या दुसऱ्या तीरावर लढाईस सज्ज [असलेले ] [दिसले. ] त्यांच्या सैन्यांत
१; खैरमोडे, खंड, १ ला, पृ. १३०-१३१.