मनुस्मृती - Page 482

परिशिष्ट-१५
मनुस्मृती

वास्तविक पाहाता असा कोणताही देश नाही जेथे धर्माने त्याच्या इतिहासात एवढी महत्त्वपूर्ण भूमिका वठविली नाही जितकी त्याने भारताच्या इतिहासात वठविली आहे. भारताचा इतिहास अधिक काहीही नसून तो केवळ बौद्ध धम्म आणि ब्राह्मणवाद या मधील मरणशील संघर्षाचा (Mortal Conflict) इतिहास आहे. या सत्याची एवढी अवहेलना केल्या गेली आहे की कोणीही याला त्वरीत स्वीकारणार नाही.

एका अन्य पुराव्यानुसार पुष्यामित्राने aaa विरुद्ध जी क्रांती केली तिचा मूळ उद्देश बौद्ध धम्माचा विनाश आणि त्याजागी ब्राह्मणवादाची स्थापना करणे हाच होता, जो विधि-संहिताच्या रूपाने मनुस्मृतीचा स्वीकार करण्याच्या राजाज्ञेने स्पष्ट होतो.

मनुस्मृतीला मूळ ईश्वरीय निर्मिती म्हटले आहे. हिला स्वयंभू (अर्थात ब्रह्मा) ने मनुला सांगितले आणि नंतर मनुने हिला मनुष्यांना सांगितले. हा वारसा मनुस्मृतीत केला आहे.

सर्वप्रथम हे लक्षात घेणे आवश्यक आहे की मनुस्मृती एक नवीन विधी-संहिता आहे जी पुष्यमित्राच्या शासन-काळात पहिल्यांदा प्रवर्तित केल्या गेली. मनुस्मृती मध्ये बौद्ध आणि वौद्ध धम्माच्या विनाशाच्या दृष्टीने स्पष्टपणे कायद्याच्या स्वरूपात व्यवस्था केली आहे. यावरून पुष्यमित्राचे नवीन शासन बौद्ध आणि बौद्ध धम्माच्या विरोधी होते हेच सिद्ध होते.'

1 : Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches , Vol. 3.