बहिष्कृत भारतावरील अभिप्राय - Page 485

बहिष्कृत भारतावरील अभिप्राय ४३९

इतर समाजांस त्यांचे दोष दाखवून आपल्या समाजाबद्दल सहानुभूति उत्पन्न करून घेण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. मात्र हजारों वर्षांच्या पूर्वीच्या स्मृतिकारांनी धर्माचे जे नियम घालून दिले त्यांना सैतानी वगैरे विशेषणें लावून किंवा कित्येक शतकांच्या रूढीची तटबंदी एकदम सुरुंगानें उडवून देण्याचा अट्टाहास करून बाचाबाची झाल्यास त्याचें सर्वस्वी खापर प्रतिपक्षार फोडण्यानें इच्छित हेतु साधणें दुरापास्त आहे. आहार, विहार, राहणी, करणी, शिक्षण, सहवास इत्यादि सुधारणांनी ज्या गोष्टी साध्य होणाऱ्या आहेत किंवा कालाचे ओघानें आपोआप घडूनहि येत आहेत, त्या दुराग्रहाने व उतावळीनें केल्यास हिंदूंची जूट होण्याऐवजी फूटच वाढत जाईल. कालाप्रमाणें रूढी बदलल्या पाहिजेत, पण आततायीपणानें ती गोष्ट साध्य होणार नाहीं. हें नूतन भावंड शांततेने समाजोज्नति करण्यांत यशस्वी होवो.

(६) मौज-तारीख १८-५-२७

बहिष्कृत भारत :-संपादक, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, बार-एऐँट-लॉ, यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्योद्धारार्थ हें पाक्षिक निघत आहे. याचे आतांपर्यंत जे तीन अंक आमच्याकडे आले, यावरून हें पाक्षिक आपलें कार्य धडाडीनें करील असें वाटतें. विषयांची मांडणी वगैरे बरी असते. अस्पृश्यांचा हा दोस्त बहिष्कृत भारताचा उद्धार करील; अस्पृश्य व स्पृश्य यांनीं याला आश्रय द्यावा. वार्षिक ace. सह ३ रुपये.

(७) प्रबोध-तारीख १५-५-२७

बहिष्कृत भारत :--{पाक्षिक परळ, मुंबई. सं. डॉ. आंबेडकर, बार. Vea, वा. व. ट. हं. सह ३ रु) सामाजिक किंवा राजकीय दुःखें जी असतील तीं वेशीवर टांगण्याला वर्तमानपत्र हें एक सुलभ साधन झालें आहे, ह्यांत शंका नाही. ह्या दृष्टीने अस्पृश्यांची दुःखें समाजापुढें ठेवण्याकरिता वरील पाक्षिकानें जो अवतार धारण केला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचें अभिनंदन करतों. हिंदुस्थानांत ज्या काळामध्ये औषधालाहि मुसलमान किंवा खिस्ती नव्हता त्या काळांतील अस्पृश्यतेची गोष्ट एका प्रकारें वेगळी होती. पण आजच्या सारख्या काळामध्ये विधर्मी व गोमांसभक्त असे लोक स्पृश्य समजण्यांत येत असतां राम-कृष्णाला भजणारे व गाईलाहि पूज्य मानणारे असे स्वधर्मीयच लोक पुरातन कालाप्रमाणें अस्पृश्यच मानण्यांत यावे हा अन्याय ह्यापुढें चालू राहणें केव्हांहि इष्ट नाहीं.

मुसलमान व खिस्ती हे स्पृश्य मानण्याला “बढी तो कान पिळी” ह्याशिवाय दुसऱ्या कोणत्या शास्त्राचा आधार आहे ? दोघांनींहि आपलीं येथें राज्यें स्थापून आमचें कान पिळले म्हणूनच ते स्पृश्य ठरले ना ? मग अंत्यजांनीहि तसेंच करून