४४८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
लोकांत शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून काही विशेष उपाययोजनाही स्वीकारण्यात आल्या. त्यापैकी एक उपाययोजना म्हणजे स्थानिक लोकांसाठी अभ्यासक्रमाची क्रमिक पाठ्यपुस्तके स्थानिक भाषेतून लिहिली जावीत ही होती. या कामासाठी या संस्थेने एक वेगळी समितीही स्थापन केली होती. या समितीकडे स्थानिक भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांची स्थापना व शाळांना सहाय्य देण्याचे मार्ग या विषयी उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु लगेच लक्षात आले की, मुख्यत्वे करून गरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या या समितीच्या कार्यकक्षा अत्यंत सीमित असून या समितीवर सोपविलेली जबाबदारी समितीला पूर्ण करणे शक्य होणार साडी, म्हणनू १८२२ साली या समितीचे रूपांतर स्वतंत्र संस्थेत करण्यात आले आणि या संस्थेला “ बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक अँण्ड स्कूल सोसायटी “असे नाव दिले गेले. १८२७ साली पुन्हा एकदा या संस्थेचे नामपरिवर्तन केले गेले आणि ही संस्था ” बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी “ या नावाने ओळखली जाऊ लागली. माननीय माऊंट स्टुअर्ट एलफिस्टन हे या संस्थेचे प्रथम अध्यक्ष होते. मुख्य न्यायाधीश आणि मुंबई विधान मंडळाचे तीन सभासद यांना उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होणे. या संस्थेच्या व्यवस्थापन मंडळात १२ युरोपियन आणि १२ स्थानिक लोकांचा समावेश होता. कॅप्टन जॉर्ज जेरव्हीस, आर. ई. आणि श्री. सदाशीव काशीनाथ चित्रे यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. कार्याला आरंभ करतांना या संस्थेला शासनातर्फे दरमहा रु. ६०० अनुदान मिळत होतै. या बरोबरच जिल्हयाच्या ठिकाणी स्वखर्चाने शासनाने प्राथमिक शाळांची स्थापना करण्यास सुरुवात केली. या शाळांचे नियंत्रण व व्यवस्थाफन जिल्हाधिकाऱ्याच्या स्वाधीन होते. “ बॉम्बे एज्युकेशन सोसायटी “ आणि “ बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी “ याशिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या दोन समांतर संस्थांत समन्वयासाठी इ. स. १८४० साली “ बोर्ड ऑफ एज्युकेशन “ स्थापन करण्यात आले. यात एकूण सहा सभासद होते. त्यांपैकी तीन सभासद शासन नियुक्त होते तर तीन सभासद बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे प्रतिनिधी होते. इ. स. १८५५ साली संचालक, लोकशिक्षण यांची नियुक्ती होईपर्यंत हे बोर्डच शिक्षण खात्याचा कारभार सांभाळत
होते.
(२) १ मार्च १८५५ साली हे बोर्ड विसर्जित करण्यात आले. या वेळेपर्यंत या बोर्डाच्या नियंत्रणाखाली इंग्रजी माध्यमाच्या एकूण १५ शाळा व महाविद्यालये डोती. या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत त्यावेळी एकूण २८५० विद्यार्थी शिकत
डब्ल्यू-२०७३-२९ ब