महाड येथें सत्याग्रहाला सुरवात होणार ४५३
ब्राह्मणवर्ग व ब्राह्मणेतर समाज यांमधील गुरूगुलामाचें नातें नष्ट होत नाहीं. तात्विक ढोबळ दृष्टीनें पाहिल्यास सामाजिक स्वातंत्र्याच्या झगड्याचें स्वरुप एकीकडे ब्राह्मण व दुसरीकडे ब्राह्मणेतर असें आहे. पण अधिक तपशीलांत शिरलों तर हें स्पष्ट व सुटसुटीत स्वरुप कायम राहत नाही. अस्पृश्यांचाच प्रश्न घेतला तर असें दिसून येईल कीं, ब्राह्मणाइतकेच ब्राह्मणेतरहि त्यांना वाईट रितींने वागवितात. आतां ब्राह्मणेतरहि अस्पृश्यांना वाईट रितीने वागवतात याचेंहि कारण ब्राह्मणीधर्माची शिकवणूकच होय. हें अगदीं खरें आहे. ब्राह्मणीधर्म ठार झाल्याखेरीज अस्पृश्यांच्या कपाळाची गुलामगिरी दूर व्हावयाची नाहीं यात शंका नाहीं. आणि ब्राह्मणी धर्म ठार करण्याकरितांच ब्राह्मणेतर चळवळीचा अवतार आहे, हैं सुद्धां तितकेंच खरें आहे. तथापि अस्पृश्यांनीं ढोबळ दृष्टीनें विचार केल्यास त्यांना काय दिसून येईल ? ब्राह्मण व ब्राह्मणेतर हे दोघेही आम्हास सारखेच छळतात असेंच त्यांचा अनुभव बोलून दाखवील. सुक्ष्म दृष्टीनें पाहिलें असतां ब्राह्मणवर्ग हाच मूळ अपराधी ; कारण अस्पृश्यासकट साऱ्या ब्राह्मणेतर जातीकरितां धार्मिक व सामाजिक गुलामगिरीच्या शृंखला ह्या वर्गानेंच निर्माण केल्या. वस्तुस्थिती अशी असल्यामुळें सामाजिक स्वातंत्र्याच्या झगड्यांत ब्राह्मण वर्गाला अजिबात वगळावयाचें हें क्रमप्राप्तच ठरतें. त्या वर्गांतील कांहीं स्वातंत्र्यप्रिय व्यक्ती अन्तःप्रेरणेच्या' टोंचणीमुळे सामाजिक स्वातंत्र्याच्या बाजूला येतील ही गोष्ट वेगळी | पण सबंध ब्राह्मणवर्ग आपल्या हक्कांची मिरास सोडून द्यावयाला आपण होऊन केव्हां ही तयार होणार नाही. तसें ज्या दिवशी होईल त्या दिवशीं . ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादच शिल्लक राहणार नाहीं. पण हिंदु समाजाचें भाग्य इतकें थोर आहे असें वाटत नाहीं. सामाजिक व धार्मिक हक्कस्वातंत्र्याकरितां ब्राह्मणवर्गाशी झगडावेंच लागेल यात मुळीच शंका नाहीं. अस्पृश्यांच्याही दृष्टीनें हा झगडा जिव्हाळ्याचा आहे. कारण ब्राह्मणी धर्माची इमारत ढांसळून पाडल्याखेरीज त्यांची काय किंवा ब्राह्मणेतरांतील इतर जातींची काय सुटका व्हावयाची नाहीं. पण हें खरे असलें तरी ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे हत्तीचा पाय आहे. त्याच्या खालीं एकादी मुंगी सहज जिवंत राहून जावयाची. दूरचा देखावा संकलित रीतीनें चित्रित करणाऱ्या चिताऱ्याचें बारीकसारीक तपशिलाकडे विशेष अवधान रहात नाही. सर्व हिंदुस्थानच्या राजकीय पारतंत्र्याचा प्रश्न सोडवूं पहाणाऱ्या काँग्रेसला भिन्न भिन्न समाजांच्या हितसंबंधाकडे पाहतांना कसें नाकी नऊ येतात हें आपण पहातों. ब्राह्मणेतर चळवळींत अस्पृश्यांच्या प्रश्नाचीही तीच गत होत असल्यास आश्चर्य नाही. म्हणूनच अस्पृश्यांच्या प्रश्नाला वेगळ्या व स्वतंत्र चळवळीचें महत्त्व आलें आहे व डॉ. आंबेडकरांसारख्या