चोखामेळा - Page 502

परिशिष्ट-२१
चोखामेळा

चोखामेळा-'' (१३३८) मराठी कवी व साधु. जातीने अस्पृश्य महार. यांच्यावर नामदेवाच्या प्रेमळ कीर्तनाचा परिणाम होऊन हा त्यांना गुरू मानू लागला. पत्नीचे नाव सोयरा. मुलगा कर्ममेळा. निर्मळा नावाची बहीण. तीही याच्याजवळच राहून आपला संसार चालवी. बंका महार हा याच्या बायकोचा भाऊ. याच्या घरी विठोबा जेवला, याच्या बायकोचे बाळंतपण केले, वगैरे अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. हा विठ्ठलाचा एकनिष्ठ भक्‍त असून पंढरीवर याची अत्यंत श्रद्धा होती. पंढरीची वारी हा चुकवीत नसे. मंगव्वेढ्याच्या कुसाचे काम चालू असताना ते ढासळून त्याखाली सापडून मृत्यू. मग नामदेवाने त्याचे प्रेत शोधून काढून त्याला अग्नि दिला आणि त्याच्या अस्थि भजन करीत मिरवत आणून विठोबाच्या देवळासमोर पुरल्या व त्यावर याची समाधी बांधली. (शके १२६० वैशाख व. १३). वारकरी लोकांचा संप्रदाय, याच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर विठोबाचे दर्शन घ्यावे, असा आहे. याचा काही अभंग व पदे आहेत. ' विवेकदर्पण ' हा छोटा ग्रंथ याचाच. “१

“ चोखामेळा हा अस्पृश्यातील एक थोर संत. इतर झालेल्या संतांपेक्षा निराळा."

“ Chokha is an eminant example of the power of God’s grace. That grace

had been magnified in Azamela and other sinners of outcaste origin. But those

did not possess the added giftofsong. It, should be added further that Chokha’s

influence on the Vaishnava mind is due to a fact which is true of Tukaram in a later generation, their speech being that of the common folk probably exercised amore potent influence on a popular religious movement than the more learned

and polished language of the Brahmins culture in Dnyanoba and his

brethren. Moreover the thought of Chokhoba is more intensely devotional than that of his contemporaries’ P. Mahar Folk-By Alexander Robertson N. A.”

यावरून इतर संतांपेक्षा चोखोबा अगदीच निराळे होते ; हे उघड दिसते. फक्त चोखोबालाच अभंगवाणीचे सामर्थ्य होते. इतर वैष्णवांवर चोखाचे फार वजन होते. कारण त्याचे कवित्व. त्या काळात म्हणजे १ ३ व्या व १४ व्या शतकात इतर त्यांचे समकालीन संत व इतर चोखोबास मानीत. शिवाय आपल्यातून

१ : गणवीर, अग्रलेख-पृ. २८७.