चोखामेळा - Page 504

४५८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अशाप्रकारे सर्वांचाच ते धिक्कार करतात. कारण जेथे "दया क्षमा पोटी शांती

TAI ते सर्व अगदी धिक्कारण्याजोगेच आहे.

अशाप्रकारे टीका करणाऱ्याचा हक्‍क बजावला आणि अभंगाद्वारे आपली बाजू साऱ्यांसमोर मांडली. आणि म्हणूनच “धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मारती कोण हा अपराध,“ असा खोटाच आळ आणण्याची गरज काय ? केवळ चोखोबाकडे इतर संत व ब्राह्मण आले किंवा चोखोबा मावंदयाचे वेळी इतर संतांकडे जेवायला गेले तर चोखोबा म्हणत,

“पंढरीचे ब्राह्मण देखतील कोन्ही | बरे मज लागुनी न पाहती जन I”

ज्ञानदेवाबरोबर तीर्थयात्रा करून नामदेव पंढरपूरला परत आल्यावर देवाने मावंदे घातले. त्याला सर्व संतमेळा उपस्थित होता.

“चोखामेळा बंका भक्तवत्सल लाडका । ते बोलाविला देखा आरोगणे II

वैराग्याचा मेरु तो गोरा कुंभार | आवडता डिंगरु केशवाचा II

ऐसे थोर साने सकळ भक्तराणे | देवे अरोगणे बोलाविले ||

अशी पंगत झडत. त्यावेळी चोखा उपस्थित राहत. पण चोखोबा भीत असत. 'मला मारतील, soda असे ते म्हणत. कारण चोखोबाची कोणतीही सामाजिक उन्नतीची कृती त्यांना आवडत नव्हती. सहन होत नव्हती. जगन्नाथ रघुनाथ आजगावकर म्हणतात की, एकदा डॉ. आंबेडकरांनी त्यांना सांगितले की, चोखामेळा हे वऱ्हाड प्रांतातील असावेत” १

डॉ. आंबेडकर म्हणतात, "पांडूरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी त्यांना सिद्ध करून देईन. २ याचप्रमाणे वि. रा. घोले सार्वजनिक सत्य धर्म (दुसरी आवृत्ति) मध्यें प्रकाशित आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, “पंढरीचा विठोबा, पंढरी महात्म्य वाचा. त्यात किती तथ्यांश आहे ह्याचे मनन करा. विठोबा हा बौद्धावतार मानिला आहे. विठोबाचे देऊळ बौद्ध लोकांनी बांधलेले आहे, त्यात बुद्धाची मूर्ति स्थापित केलेली होती. जेव्हा बौद्ध धर्मानुयायी लोकांचा मोड झाला तेव्हा आर्य धर्मस्थापकांनी ते देऊळ बळकावून त्या मूर्तीला विठोबा नांव दिले."

`: संत, पृ (VKR), ५.

१ : खंड १८, भाग-३, पु. ४२४.