दादासाहेब गायकवाड - Page 505

परिशिष्ट-२२
दादासाहेब गायकवाड

भाऊराव यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील आंबे नावाच्या गावी १५ ऑक्टोबर १९०२ रोजी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव कृष्णराव तर आईचे नाव पवळाबाई

होते.

त्यांनी १९२४ पासूनच सार्वजनिक कार्याला सुरूवात केली. ते १९२४ ते १९२९ पर्यंत श्री. शाहु छत्रपती बोडिँगचे सुपरिन्टेन्डेट होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपर्कात कसे आले याविषयी म्हणतात, '' १९२७ साली झालेल्या महाड सत्याग्रहापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची व माझी फारशी ओळख नव्हती. महाड सारख्या कोंकणी भागांत चवदार तळ्यावर समानतेने पाणी भरण्याचा आपला हक्क बजावणेंसाठीं जमलेल्या त्या पंधरा हजार सत्याग्रहींची चारचारच्या रांगांनी शिस्तीने महाडच्या गांवातून चाललेली तीं मिरवणूक अजून माझ्या स्मृतीपटावरून बुजली नाही. सामुदायीकरित्या समानतेचे हक्क मिळविण्याची तशी ही पहिलींच चळवळ आमचे समाजांत झाली असावी असें वाटतें. १९२७ पर्यंत फार झालें तर आमच्यांतील पुढारी वर्गांनीं सभेंत भाषणें करण्यापलिकडे कांहीं केलें नव्हतें. परंतु महाडच्या सत्याग्रहापासून सक्रीय कार्याला सुरवात झाली असें म्हणण्यास मला मुळींच संकोच वाटत नाही. महाड येथे जमलेला अफाट जनसमूह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या चळवळीमुळेंच जमला होता. स्पृश्य वर्गीय लोकांच्या जुलमाला वैतागलेल्या लोकांना या चळवळीमुळे सुरवातीस थोडाफार अधीक जुलूम सोसावा लागला. परंतु या जुलमामुळें विस्कळीत असलेला अस्पृश्य समाज सुसंघटित होऊन येणाऱ्या स्थितीस तोंड देण्यास सिद्ध झाला. वाईटांतून चांगले निघतें म्हणतात, त्यांतलाच हा प्रकार झाला आहे. “१ |

महाडच्या या सत्याग्रहाचा दादासाहेबांवर फार मोठा प्रभाव पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच नेतृत्व अस्पृश्य समाजाला शेकडों वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त करू शकते अशी त्यांची बालंबाल खात्री झाली. ते म्हणतात, “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खरेखुरे अस्पृश्यता [निवारक ] आहेत. ' खरेखुरे ' म्हणण्याचा अर्थ इतकाच कीं बरेच अस्पृश्यता निवारणाचा

आव आणणारे सद्गृहस्थ स्पृश्यास्पृश्य भेद कायम मानून व्याख्यानबाजीच्या [वेळी ]

मात्र अस्पृश्यता निवारणावर सुंदर भाषण करूं शकतात. असल्या माणसांचा

१ : जनता, खास अंक १९३३, पृ. ६.