दादासाहेब गायकवाड - Page 506

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ४६०

भरणा स्पृश्यास्पृश्य मानलेल्या दोन्हीं वर्गात आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तसें नाही. . . . . . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कारकीर्दीस सुरवात होताच हा मनू पार पालटला व जनतेचा त्यांच्या ठायीं अढळ विश्वास बसला. इतकी पूर्व भूमिका तयार झाल्यानंतर डॉ. बाबासाहेबांचे हाकेस ओ देणारी जनता आपले बलिदान देण्यास तयार झाली हें आतांपर्यंतच्या चळवळीवरून वाचकांच्या ध्यानीं येईल, अस्पृश्य मानलेल्या समाजात आपल्या उन्नतीविषयीं माणुसकीच्या व स्वाभिमानाच्या ज्या भावना आज दिसत आहेत त्या सर्वांचे जनकत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाच दिले पाहिजे. आज जर डॉ. बाबासाहेबांसारखा कर्तबगार पुरूष अस्पृश्य मानलेल्या समाजांत निर्माण झाला नसतां तर आज आपल्या डोळ्यांना अस्पृश्य मानलेल्या वर्गांत जी जागृति झाली आहे ती खास झालेली दिसली नसती असें माझें प्रामाणिक मत आहे, व म्हणून अस्पृश्य मानलेल्या जनतेत आपल्या माणुसकीबद्दलच्या जागृतीचे सर्व श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाच देणें योग्य आहे. ” १

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही चळवळ म्हणजेच मानव मुक्तीची चळवळ . आणि तिला यशस्वी करणे हेच आपले जीवित कार्य (मिशन) या ध्येयाने प्रेरीत होऊन दादासाहेबांनी स्वतःला या चळवळीत झोकून दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह करण्याचे निश्चित केले. यामागे त्यांचे दोन उद्देश होते. पुण्याच्या खालोखाल सनातन्यांचे माहेरघर नाशिक आहे, हा एक आणि दुसरा भाऊरावांच्या कर्तृत्वाने सारा नाशिक जिल्हा जागृत झालेला आहे. सत्याग्रहाचे नेतृत्व करण्यास आपला विश्वासू सहकारी खंबीर आणि कार्यक्षम आहे. "' १९३० च्या मार्च महिन्याचे २ तारखेस नाशिक येथे श्री.काळे-

राम मंदिरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मंदिरप्रवेश सत्याग्रहाची मोहिम सुरू झाली. याही प्रसंगी १ मेल लांबीची सुमारे पंधरा हजार सत्याग्रहींची मिरवणूक राम मंदिरावर अत्यंत शांततेने व शिस्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आज्ञेप्रमाणे जाऊन तिनें राममंदिर प्रवेश सत्याग्रह चळवळीचे निशान फडकविले. “ २

दिनांक ४ ऑक्टोबर १९३० रोजी डॉ. आंबेडकर गोलमेज परिषदेत उपस्थित राहाण्याकरिता लंडनकरिता रवाना झाले. परिणामी या सत्याग्रहाची संपूर्ण जबाबदारी त्यांचे ' सेनापती भाऊराव गायकवाड आणि अमृतराव रणखांबे यांचे सारखे सरदार यांच्यावर आली. '

१ : तत्रैव, पृ. ७.

२ : तत्रैव, पृ. ६.