दादासाहेब गायकवाड ४६१
दुसरी गोलमेज परिषद सुरू असताना ह्याच वेळी नाशिकच्या मंदिरप्रवेशाच्या सत्याग्रहास जोर चढला. पाच हजार वीर नाशिकला उभे ठाकले. नाशिक सत्याग्रहाचे वृत्त ' लंडन टाइम्स ' मध्ये प्रसिद्ध होई. त्यामुळे डॉ, आंबेडकरांचे हात बळकट होत.
या दरम्यान दिनांक २३ सप्टेंबर १९३१ (श्रावण महिना) रोजी पांडवप्रताप ग्रंथाच्या मिरवणूकीच्या .निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील मुखेड गावी सत्याग्रह झाला. सत्याग्रहात प्रामुख्याने दादासाहेब गायकवाड, अमृतराव रणखांबे, विठ्ठलराव रणखांबे, सावळेराव दाणी, रूपाजी वस्ताद, रामभाऊ पालजी मारू व टी. बी. काळे ही मंडळी होती. स्पृश्यांनी सत्याग्रहींना बेदम मारले होते. माराने दादासाहेबांचे सगळे तोंड सुजले होते. काही वेळ तर ते बेशुद्ध पडले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लगेच लंडनहून सत्याग्रह कमेटीच्या सचिवाला
संदेश पाठविला. त्यात ते म्हणतात, “। have been reading the telegrams regarding the struggle at mukhed between our people and the castemen. । am glad to find that our people are prepared at all casts to carry on the fight to a success. | congratulate them on their spendid resolve.” ?
या घटनांचे पडसाद ' लंडन टाईम्स * द्वारे गोलमेज परिषदेवर उमटले. परिणामी अस्पृश्यांचा प्रतिनिधी कोण आणि त्यांच्या मागण्यांची वास्तविकता ब्रिटीशांच्या लक्षात आली.
नाशिकचा सत्याग्रह थांबविण्याविषयी डॉ. आंबेडकरांनी आपल्या दिनांक ३ मार्च १९३४ च्या पत्रानुसार दादासाहेब गायकवाडांना कळविले आणि त्यानुसार ताबडतोब सत्याग्रह थांबविण्यात आला. याप्रमाणे दि. २ मार्च १९३० पासून सुरू असलेला सत्याग्रह सतत चार वर्षे दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार सुरू होता. या सत्याग्रहामुळे दादासाहेबांना २ महिने धुळ्याच्या कारागृहात सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागली. इतकेच नव्हें तर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिला कारागृहवास भोगावा लागला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९४२ साली मध्यवर्ती सरकारचे मजूरमंत्री झाले. त्यांच्या सूचनेनुसार दादासाहेबांनी मजूर कल्याण अधिकारी (Govern- ment Labour Welfare Officer, Western Aviation Circle, Bombay) या पदावर रूजू झाले. परंतु नोकरीमुळे आपण समाजकार्यापासून विन्मुख होत आहोत ही त्यांना सारखी टोचणी वाटत होती. शेवटी त्यांनी ही नोकरी सोडली आणि पुर्ववत समाजकार्य सुरू ठेवले.
1: Writings and Speeches, Vol. 17, Part -1, P. 193.