दादासाहेब गायकवाड - Page 508

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ४६२

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षातफे १९३७ साली दादासाहेब मुंबई प्रांतिक लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये नाशिक पश्‍चिम भाग मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी असेंब्लीमध्ये आपल्या उत्कृष्ट वक्तत्वकलेची छाप पाडली होती. त्यामुळे तत्कालीन सभापती मावळंकर यांनी दादासाहेबांचा ' उत्कृष्ट वक्ता ' म्हणून गौरव केला.

दादासाहेब लोकसभेमध्ये खासदार असताना श्री. प्रकाशवीर शास्त्री यांनी ४ मार्च १९६० रोजी अस्पृश्यांना धार्मिक संरक्षण बिल आणले. त्याला विरोध करताना दादासाहेब म्हणाले की, इतर धर्मियांना बंदी घालण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे ? त्यांनी आपली न्याय्य व रास्त बाजू पुराव्यानिशी मांडण्याकरिता मनुस्मृतीच्या इंग्रजी, मराठी व संस्कृत अशा तीन प्रती सभागृहात आणल्या होत्या. दादासाहेबांनी ज्या पानांवर अस्पृश्यांनी हीन दर्जाचे जीवन जगावे असा उल्लेख आहे तो भाग सभागृहाला वाचून दाखविला व पटवून दिला. एवढेच नव्हे तर “ मनुस्मृती ही काही महाराळे लिहिली नाही “ असे सभागृहाला सांगितले. परंतु इतर सभासदांनी अडथळे आणून विरोध केला. तेव्हा ह्या क्रांतिकारकाने निर्भिडपणे सांगितले--

“ उतारे वाचून दाखविण्यास मला अडथळे आणले तर मी तुम्हाला सांगू

इच्छितो की, ह्या प्रती केवळ टेबलावर ठेवण्याकरिता आणलेल्या नाहीत, तर

अस्पृश्यांसंबंधी ज्या पानावर वाईट मजकूर आहे, ती पानें अशा रीतीने

फाडण्याकरिता आणलेल्या आहेत. “ (मनुस्मृतीच्या ज्या पानांवर अस्पृश्यांसंबंधी

वाईट मजकूर होता ती सभागृहात टर्‍टरा फाडली व तुकडे तुकडे केले.)

उपसभापतीने अशा तर्‍हेचा विरोध करण्यास आपण परवानगी देणार नाही असे सांगितल्यावर दादासाहेब म्हणाले, ' अशा तऱ्हेची भावना दुखविणारे ग्रंथ आम्ही डोक्यावर घेऊन नाचावे,' असे आपणास वाटते काय ? (गोंधळ).

रघुनाथसिंग यांनी, वापरलेले शब्द परत घेण्यास सुचविले. त्यावर दादासाहेब म्हणाले, “ एकही शब्द मी मागे घेणार नाही. “

प्रकाशवीर शास्त्री यांनी, ” हया बिलामागील भावना लक्षात न घेता धार्मिक ग्रंथांची पाने फाडून अपमानकारक असे वातावरण सभागृहात निर्माण केले “ असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर दादासाहेब म्हणाले, “ माझी अशी विनंती आहे की सरकारने असले प्रकार बंद करण्यापेक्षा अशा धार्मिक ग्रंथावरच बंदी घालावी. “

(Lok Sabha Debates, Vol. XXXIX No. 20, Dated 4th March 1960)