दादासाहेब गायकवाड - Page 509

दादासाहेब गायकवाड ४६३

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार १९५४ साली दादासाहेबांनी पडीत जमिनी भूमिहीनांना देण्याबाबत मराठवाड्यात सत्याग्रह सुरू केला. त्यात ३००० सत्याग्रहींना तुरूंगात जावे लागले. स्वतः या कर्मविराला तीन महिन्याचा कारागृहवास भोगावा लागला. याचप्रमाणे १९५९ साली महाराष्ट्रभर सत्याग्रह सुरू करून ३५,००० लोकांना शिक्षा झाल्या. त्यांच्याच नेतृत्वाखाली १९६४ साली झालेला भूमिहीनांचा सत्याग्रह अद्वितीय ठरला. या सत्याग्रहाचे लोण संपूर्ण भारतात पसरविले. प्रत्येक प्रांतात भूमिहिनांनी सत्याग्रह केला. हा सत्याग्रह “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया' या पक्षातर्फे करण्यात आला. त्यात ३ लक्ष ४० हजार सत्याग्रहींनी स्वेच्छेने भाग घेतला. पैकी ४० हजार सत्याग्रहींनी तुरूंग भरले. परिणामी १४ मागण्या मान्य करून घेतल्यावरच सत्याग्रह मागे घेण्यात आला.

भारत आणि पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर पाकिस्तानच्या भागात असलेल्या अस्पृश्यांना भारतात येणे दुरापास्त केले होते. पाकिस्तानातील लोकांना अस्पृश्यांचा उपयोग हीन दर्जाची कामें करून घेण्याकरिता करावयाचा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तानात अडकविलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना भारतात आणणे अगत्याचे वाटले. त्यांनी तत्कालीन प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू यांना सुद्धा त्वरीत कार्यवाही करण्यासाठी दिनांक १८ डिसेंबर १९४७ रोजी पत्र लिहीले होते. : यासाठी त्यांनी दादासाहेब गायकवाड आणि आर. एस. जाधव यांची नेमणूक करून त्यांच्याद्वारे सर्व अस्पृश्यांना भारतात आणावे अशी योजना केली होती. त्यानुसार ते त्या पदावर (Officer on Special Duty for Refugees) रूजू झाले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वारणानंतर, त्यांच्या सर्वच संघटनेला क्रियाशील ठेवण्याकरिता दादासाहेबांनी आपली सर्व शक्ती पणास लावली होती. महाराष्ट्रात बौद्धांना शैक्षणिक सवलती मिळवून देण्यात त्यांना यश आले. तशाच सवलती केंद्राकडून मिळाव्या याकरिता त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. भारतीय संविधानाच्या पावित्र्याचा संदेश साऱ्या भारतीयांना हात उंच करून सांगणाऱ्या संविधान निर्मात्याचा सोळा फूट उंचीचा पुतळा लोकसभागृहाच्या समोर उभा करण्यात दादासाहेबांचे सुद्धा योगदान आहे. ज्या पवित्र भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकारांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बुद्धाच्या २५०० वर्षानंतर पुन्हा धम्मचक्रप्रवर्तन केले ती नागपूरची १४ एकर दीक्षा भूमी दादासाहेबांच्या मध्यस्थीने पदरात [पडली ] [आहे. ]

डब्ल्यू-२०७३-३० अ