४६४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
दादासाहेब गायकवाड यांच्या विषयी केवळ अस्पृश्य समाजातच नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजात अत्याधिक आदर होता. यामुळेच त्यांना कोणी ' दादासाहेब ' तर कोणी ' कर्मवीर ' या नावाने संबोधित असत. त्यांनी बाळगलेली जीवननिष्ठा त्यांचे जीवन ललामभूत करणारी ठरली आणि म्हणूनच भारत सरकारने दिनांक २६ जानेवारी १९६८ दिनी त्यांना 'पद्मश्री' हा बहुमान बहाल केला. बौद्ध समाजातील दादासाहेब हे पहिले पद्मश्री ठरले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकारांनी दिलेल्या आदेशाला कार्यान्वित करण्याची जबाबदारी दादासाहेबांवर होती आणि ते त्यानुसार त्याला तसे रूप देण्यात आस्थेवाईकरित्या झटत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेबांना दिनांक ८ सप्टेंबर १९४२ रोजी पाठविलेल्या पत्रात म्हणतात,
* प्रिय भाऊराव,
ee मी जरी सार्वजनिक जीवनापासून दूर असलों तरी आपली या अवस्थेप्रत
आणलेली चळवळ जिवंत ठेवली पाहिजे याचा मला कधीच विसर पडलेला नाही.
माझ्या गैरहजेरीत समाज कार्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे, त्यांतून
आपण यशस्वी पार पडाल याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. माझ्या
एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलर (मजूर मंत्र्या) च्या कारकिर्दीत इतरांबरोबर आपल्याही समाजाला सर्व दृष्टिनी मदत करण्याचे ठरविले आहे. . . . . i
कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या जीवन आणि कार्याचे यथार्थ शब्दात मूल्यांकन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
““ मी माझे आत्मचरित्र लिहिणार आहे. त्यात अर्धा अधिक भाग भाऊरावाचा असणार. तो भाग जर नसला तर माझे आत्मचरित्र परिपूर्ण होणार नाही. “
अशा या बहुजन हिताय बहुजन सुखाय आपले संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या कर्मविराचे परिनिर्वाण दिनांक २९ डिसेंबर १९७१ रोजी झाले.
संदर्भ : प्रबुद्ध भारत, कर्मवीर दादासाहेब गायकवाड-पषष्ठ्यद्विपूर्ति गौरव विशेषांक ३० मार्च
१९६३.
जीवनज्योत-पद्मश्री दादासाहेब गायकवाड गौरव अंक ऑक्टोबर १९६८.
डम्ल्यू-२०७३-३० ब