टिळकांचा सत्कार ७
करोत ! मिश्रविवाहाच्या बिलास विरोध करणाऱ्या व सर्व ब्राह्मणेतरांना शिद्दी लोकांच्या जोडीस घेऊन बसविणाऱ्या ' केसरी ' च्या या मालकांना मान देऊन बहुसंख्य जनतेच्या स्वाभिमानाला पायाखाली तुडविण्यास कोणी स्वाभिमानशून्य व्यक्ति तयार होत असल्या तर खुशाल होवोत ! आमचें एवढेंच म्हणणें आहे कीं, या व्यक्तींना पुण्याच्या सर्व नागरिकांच्या नांवावर ही गोष्ट करू द्यावयाची नाहीं, असा आमचा निश्चय आहे ; व ज्यांना तो पसंत असेल त्या सर्वांना सदर सभेस हजर राहून आपले विरुद्ध अभिप्राय जाहीर करण्याविषयी आमची विनंती आहे.
विविध विचार : मूकनायक, ३१ जानेवारी १९२० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, सोर्स मटेरियल खंड-, पृ. संदर्भ सूची-शुद्धीपत्रक पृ. (७).