परिशिष्ट-२३
खेड्यापाड्यांतील अस्पृश्यांवर होणारा जुलूम
श्रीयुत संपादक बहिष्कृत भारत, मुंबई यांस क्. सा. न. वि. वि.
खालील मजकुरास येत्या अंकीं स्थळ मिळेल अशी आशा आहे.
निळोंडपाडा ता. दिंडोरी येथें सुमारे १/१।। महिन्यापासून गुरें मरण्याचा रोग सुरू झाला आहे. रोगाने कांहीं लोकांची गुरें मेलीं. त्यावरून सदर गांवचे समस्त महारमंडळीस ता. १५ जुलै रोजी रात्रीं सुमारें १० वाजतां गांवनायकाचे eed गांवांत बोलाविले. त्यावरून समस्त महार मंडळी गांवांत चावडीपुढें हजर झाली. सदरचा रोग महारांनींच आपली ' पांढरी ' अगर ' मेसू ' उठवून उत्पन्न केला असावा, असा लोकांचा दुराग्रह पडला. परंतु त्यांपैकीं एकानें असें सांगितलें कीं, “ सदर रोगाची परीक्षा करण्यासाठीं एकादा भगत (GAA) आणा व तो ज्याचें नांव सांगेल त्यास जबाबदार धरा, व भगतासाठीं झालेला खर्च त्याजवळून वसूल करा “ इतकें होतें न होतें तोंच तेथील एक आडदांड टारगट मराठा उठला व म्हणाला “ दादा आपली म्हैस घरीं मेली असेल पहातां काय ?” असें म्हणून आपल्या आंगीं असलेलें मुर्दाड क्षात्रतेज दाखविण्यासाठीं निरपराधी दीन अशा महारांवर आपल्या हातातील काठी चालविली. लगेच त्याचे दुसरे दोघे भाऊ हेहीपण आपल्या काठ्या घेऊन महारांना मारपीट करण्यास जोरानें पुढें सरसावले. येथें असला प्रकार होईल अशी कल्पना सुद्धां महारांना नसल्यामुळे ते एकदम गांगरून गेले ; व प्रतिकार करण्याचे धैर्य खचलें. त्यामुळे महार लोकांना बेदम मारण्यांत आले आहे. त्यांपैकीं कांहीं तरुण माणसें थोडा-थोडा मार सहन करून पळून गेलीं. परंतु म्हाताऱ्या गरीब महारांना पळून न जातां आल्यामुंळें त्यांना मात्र बेदम मारण्यांत आलें असून त्यांपैकी ७ मार्णसें दिंडोरी येथें दवाखान्यांत औषधोपचारासाठी असल्याचें समजतें.
ज्या रोगानें गांवांतील गुरें मेली, त्याच WIM महारांची सुद्धां गुरें मेलेली आहेत. असें धडधडीत उघड्या डोळ्यांनी दिसत असूनसुद्धां या आडदांड द्विपाद नरपशूंनीं मनाची नसली तरी जनाची थोडीफार लाज बाळगावयास पाहिजे होती ; व थोडासा सुविचार करावयास पाहिजे होता कीं ज्या रोगानें आपलीं गुरें Fell आहेत त्याच WI महार लोकांची सुद्धां गुरें Ach आहेत. तेव्हां सदरील रोग महार स्वतः निर्माण करून आपलीं नुकसानीं कशी करून घेतील ? परंतु