४६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
इतका अगदीं साधा सुविचार करण्याची अक्कल टाळक्यांत (मडक्यांत ?) असेल तेव्हां ना? दुसरें असें कीं १००/१२५ गांवकरी मंडळी जमली असतां व त्यांपैकीं ३ माणसें उठून महारांना मारीत असतां इतरांनी गंमत पहावयाची हैं आश्चर्य आहे ! परंतु जन्मल्यापासून ' महार म्हणजे पशूपेक्षांहीं नीच,“ “ महार म्हणजे जणू कांही माणूसच नव्हें “ असलें बाळकडु वर्णाश्रमधर्मानें पाजल्यामुळें व त्यावरच धष्टपुष्ट झाल्यानें महारांवर होत असलेल्या जूलूमाबद्दल पाषाणहृदयी गावकऱ्यांना काहींच वाटलें नाहीं यांत आश्चर्य नव्हे. परंतु दु:खांत सुख या न्यायानें गहारावर होत असलेल्या या असह्य मारामुळें एक म्हातारा महार मूर्च्छा येऊन खालीं जमिनीवर पडलेला पाहून, थोड्या उशिरा कां होईना परंतु गांवचे श्री. गोपाळराव पाटील यांस कळवळा आला व आपल्या पुतण्यास (पोलीस पाटलास) ते बजावून म्हणाले कीं, “ तू पोलीस पाटील असून तुझ्या समक्ष गांवच्या महारांना हे लोक बेदम मारीत असतां जर एकाद्याचा खून झाला तर तुला जबाबदार धरलें जाईल. तूं पहातोस काय ? “ असें सांगितल्यानंतर पोलीस Wear पंचनामा करून दुसरे दिवशीं ता. १६-७-१९२७ रोजीं पंचनामा समक्ष दिंडोरीस फौजदार हजर नसल्यानें हवालदाराजवळ दिल्याचें समजतें परंतु खेदाची गोष्ट ही कीं पोलिस खात्याकडून सुद्धां अद्यापि कांहींच चौकशी झालेली दिसत नाहीं.
अल्पसंख्यांक निरपराधी गरीब महारांवर या आंग्लाईच्या राज्यांतसुद्धां पुष्कळ ठिकाणीं मोंगलाईच्या FRG REAM चालू आहेत. तेव्हां या दोन वर्गाला असल्या जुलूमांतून वांचविण्यासाठी सरकारनें योग्य ती खबरदारी घ्यावी व आंग्लाई म्हणजे “ मोंगलाई नव्हे “ असें योग्य न्याय देऊन सिद्ध करून द्यावें अशी सरकारास नप्र विनंति आहे. तसेच अस्पृश्य समाजानेंसुद्धां असल्या जुलूमांतून सुटण्यासाठी पुष्कळ दिवसांपासून हाडीमांसीं खिळलेल्या घातुक चालीरीती समूळ नाहींशा केल्याशिवाय गत्यंतर नाहीं. तसेंच अपापसांतील सर्व मतभेद विसरून असल्या जुलूमांचा प्रतिकार करण्यासाठीं, एकदिलानें सर्व अस्पृश्यांनीं सुसंघटित झाल्याशिवाय सध्याच्या काळांत तरणोपाय नाहीं येवढाच इशारा तूर्त पुरे.
आपला नम्र,
भा. कु. गायकवाड.
eee
बहिष्कृत भारत, ता. १२ आगष्ट १९२७.