परिशिष्ट-२४ |
` महाड म्युनिसिपालिटीची पुच्छ प्रगति.
तारीख ४-८-१९२७ रोजीं महाड म्युनिसिपालिटीची सभा होऊन म्युनिसिपालिटीच्या मालकीच्या सार्वजनिक जागा पाणवठे वगैरे संबंधाचा एक ठराव पास करण्यांत आला. म्युनिसिपल सभासदांच्या प्रतिगामी धोरणाचा ज्यांना अनुभव आहे त्यांना त्यांत विचित्र आणि नवलाचें असें कांहींच वाटणार नाही ! परंतु आश्चर्याची गोष्ट इतकीच कीं श्री. वीरकर यांनीं स्वतः आपण उदार मतवादी असल्याचें इतर सभासदाना वारंवार बजाऊन व मी सुधारणेचा पुरस्कर्ता आहे अशी थाळी पिटून सदर ठराव Wigs मांडला. ठरावाचा आशय असा कीं “१९२४ सालीं म्युनिसिपालिटीच्या मालकीचे सार्वजनिक पाणवठे वगैरे अस्पृश्यांसुद्धां सर्वांना खुलें असल्याचा झालेला ठराव सार्वजनिक शांततेच्या दृष्टीनें हानिकारक असल्यामुळें तसल्या सार्वजनिक ठिकाणीं अस्पृश्यांना बंदी करण्यांत यावी” श्री. वीरकर यांची उदारता आणि सुधारणा ती हीच ! ठरावाच्या समर्थनार्थ केलेल्या आपल्या भाषणांत श्री. वीरकर म्हणाले, 'अशिक्षित वर्गातल्या लोकांना असली सुधारणा पटलेली नसल्यामुळे म्युनिसिपालिटीनें अशी सावधगिरी बाळगणें इष्ट
ae. या मुद्यावर श्री. तुळजारामभाई यानीं अशा तऱ्हेची बंदी लादल्याबद्दल
अर्ज अशिक्षित वर्गाकडून आलेला नसून सुशिक्षित-निदान अर्धशिक्षित ब्राह्मण, गुजर वगैरे लोकांकडूनच विशेषतः आल्याचे श्री. वीरकर व अध्यक्ष आणि सभासद यांच्या निदर्शनास आणलें. वकिलांना लाजविणाऱ्या या सडेतोड मुद्याला प्रत्युतर देणें श्री. वीरकर यांना शक्यच नसल्यामुळे “खासगी पाळ्या व्यक्तिशः खर्चानें बांधावयास भाग पाडणाऱ्या चौदार तळ्यासारखीं ठिकाणें अगोदर कायद्यानें सार्वजनिक तरी ठरतील की नाही.” याबद्दल शंका प्रदर्शित केली. यावर अध्यक्षांनी सुचविलें की या शंकेचा विचार करण्याचें आज आपणांस कारण नाही. आज श्री. वीरकर स्पृष्यास्पृष्यांचा संबंध आला म्हणून तळें सार्वजनिक म्हणावयास तयार नाहींत. उद्यां आळी आळींचा आणि कुटुंबा- कुटुंबाचा संबंध आला तर विशिष्ट आळीचे अथवा क्रमानेंच विशिष्ट कुटुंबाचे तळे आहे असें प्रतिपादन करण्यास ते चुकणार नाहींत. विजय मराठा छापाच्या सभासदांच्या भेकड वृत्तीमुळें श्री. वीरकर यांच्या पदरीं यशाचा वाटा पडला. असला ठराव पास करून घेऊन श्री. वीरकर यांनीं ज्या म्युनिसिपालिटींत अनेक वर्षे अध्यक्षांचे वगैरे काम आपुलकीने केलें त्या म्युनिसिपालिटीला जगाच्या