४६८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
उपहासास पात्र करण्याचें पाप पदरीं जोडावें याबद्दल श्री. वीरकर यांना दोष न देतां कुणीही त्यांची कींवच करील | ! ही श्री. वीरकरांची आणि त्याबरोबरच महाड म्युनिसिपालिटीची पुच्छ प्रगति नव्हे तर काय !
आतां असल्या ठरावामुळें सरकारी ग्रँट बंद केली जाते कीं काय असा प्रश्न आहे. आणि ती तशी बंद होत असली तर म्युनिसिपालिटीच्या येवढ्या मोठ्या नुकसानीबद्दल जबाबदार कोण ? याबद्दल कायद्याचा सल्ला श्री. वीरकर हे देतीलच.
आपला,
श्री. गो. देशपांडे.
त त त
स्या
बहिष्कृत भारत, ता. १२ आगष्ट १९२७.