परिशिष्ट-२५
मध्यप्रांत-वऱ्हाड हिंदु परिषद
अध्यक्ष सर शंकरन् नायर यांचे भाषण
“ मी हिंदू सभेचा सभासद नसतांही तुम्ही मला अध्यक्ष निवडून माझा मोठाच गौरव केला आहे. मी सभासद नसलों, तरी हिंदु सभेचें जें महत्त्वाचें कार्य आहे त्याला मात्र माझा पूर्ण पाठिंबा आहे.
हिंदूसभा
कांही वर्षापूर्वी मुसलमान लोकांत हिंदूप्रमाणें इंग्रजी शिक्षणाचा प्रसार झाला नव्हता, तेव्हा देशांत होणाऱ्या सुधारणांत आपण कोपऱ्यात पडून राहूं नये, म्हणून त्यांनीं आपला वेगळा संघ बनविला ; मुसलमान पुढाऱ्यांनी वाजवीपेक्षां जास्त जोरांनें आपल्या हक्कांची मागणी सुरू केली. अर्थात, आपल्या हक्कसंरक्षणाची तरतूद केली तर त्याबद्दल त्यांना दोष देतां येत नाही. सरकारनें त्यांची मागणी मोठ्या खुषीनें मान्य केली. बंगालची फाळणी रद्द करा अशी जी बंगाली लोकांनी
चळवळ चालविली, तिला विरोध करण्यासाठी प्रथम मुस्लिमलीग निघाली ! लॉर्ड
मिंटो यांनीं मुसलमानांची मागणी मान्य केली व मोर्ले मिंटो सुधारणांत मुसलमानांच्या मागणीला प्रथम स्थान मिळालें. पुन्हा सुधारणांचा दुसरा हप्ता देण्याची वेळ आली तेव्हां, हिंदु-मुसलमान पुढाऱ्यांनी आपसांत
लखनौचा करार
केला; व त्याला सरकारनें सुधारणायोजनेंत मान्यता दिली. यामुळें हिंदु-मुसलमानांचे भांडण थांबले. यापुढें म. गांधींची असहयोगाची चळवळ सुरू झाली. अर्थात् ती सद्धेतुमूलक होती. त्यांनीं खिलाफतीच्या चळवळीस महत्त्व देऊन दोन जातींचे ऐक्य करण्याची खटपट केली. तसें करितांना गांधींनी हिंदूंचे सर्व हक्क सोडून दिल्यासारखेंच केलें. ते किंवा त्यांचे सहकारी मुसलमान पुढारी यांना आपल्या कृत्यांचे परिणाम तेव्हां दिसून आले नाहींत “१ वर्षांत स्वराज्य मिळवून देतों“ असें गांधी म्हणाले. तेवढ्यापुरती मुसलमानांनीं त्यांची अनत्याचाराची अट पाळली. पण इतक्यांत मुसलमान लोकांमध्ये