४७० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
पॅन-इस्लामी वृत्ति
(जगांत मुसलमान तेवढा एक ही भावना)
बळावली आणि अशिक्षित मुसलमान लोक आपले हक्क जबरीने हिंदूंच्या माथी मारूं लागले ; आणि मलबार व अन्यत्र भयंकर दंगेधोपे झाले. हा परिणाम पूर्वीच लक्षांत यावयास हवा होता. महायुद्ध सुरू होतांच तुर्की राष्ट्र इंग्रजांच्या विरुद्ध लढाईंत सामील झालें ; तेव्हां सरकारविरुद्ध खवळलेल्या मुसलमानांनी पंजाबांत हिंदु लोकांवर हल्ले चढविले ; आणि गांधींनी असहयोगाची चळवळ सुरू केल्यावर त्या चळवळींत मुसलमान पुढारी- सामील असतांही सरकारविरूद्ध खवळलेल्या मुसलमानांनीं हिंदूंच्या देवळांवर हल्ले करून त्यांचा विध्वंस केला ! तथापि, गांधींनीं मुसलमानांचे लाड चालूच ठेविले. त्याचा परिणाम असा झाला कीं, मुसलमान लोक आपल्या पुढाऱ्यांची फिकीर न करितां शेफारून त्यांनी भलभलत्याच मागण्या करण्यास सुरवात केली. तेव्हां अर्थातच हिंदु लोकांना त्यांचा राग आला व भीति वाटूं लागली. दोन्ही समाजांतील तेढ वाढत चालली ; मतभेद तीव्रतर झाले आणि आपले कांही चालत नाही, असें पाहून
गांधीजींनी राजकारण सोडलें |
पण, त्यांच्या चळवळीचे परिणाम कायमच राहिले. . असहयोगी पक्ष व कांग्रेस यांनी शांतता व सलोखा यांच्यासाठी सतत ओरड व खटपट चालू ठेविली ; पण त्यांना हिंदू-मुसलमानांचे ऐक्य घडवून आणतां आले नाहीं, व यापुढेंहि घडवून आणणें अशक्य आहे. गांधीच्या पाठीमागून चित्तरंजनदास हे चळवळीचे पुढारी झाले. त्यांनींही सद्धेतुपूर्वक व स्वराज्याची चळवळ सुगम व्हावी म्हणून हिंदू-मुलसमानांचा एक करार घडवून आणला, पण, या कराराने बंगाल्यांत हिंदू-मुसलमानांची एकी होण्याऐवजी परस्परांत वैरभाव मात्र वाढला! या परिणामाचे वर्णन प्रो. रमेशचंद्र बानर्जी यांनीं 'वैदिक मॅगेझीन' मध्यें पुढीलप्रमाणें केलें आहे :-
एकीच्या कराराचा परिणाम !
“दुबळ्या हिंदु समाजाला आपल्या बायकामुलांचे संरक्षण करितां येईनासें झालें, तेव्हां त्यांची जी हीन स्थिति झाली, तिचें वर्णन शब्दांनी करणे अशक्य आहे. त्याची केवळ कल्पनाच करितां येईल, बंगालच्या हिंदूंची स्थिती आज तशी झाली आहे. एकीकडे आमचे देशभक्त पुढारी (बहुतेक हिंदूच) आपल्या भाषणांत