मध्यप्रांत-वप्हाड हिंदु परिषद - Page 517

मध्यप्रांत-वऱ्हाड हिंदु परिषद ४७१

'स्वराज्य' व 'हिंदु-मुसलमानांची एकी' यांचा जोरदार शब्दांनी पुकारा करीत असतां दुसरीकडे मुसलमान गुंडांनी खेड्यापाड्यांत हिंदूच्या बायका पळविण्याचा सपाटा चालविला होता. उत्तर आणि पूर्व बंगाल्यांतील खेड्यांत त्यांचे हे प्रयत्न व्यवस्थित व संघटित रीतीनें सुरू होते. मोठमोठे पुढारी स्वराज्यावर व्याख्यानें देण्यांत चूर होते ; व मोठमोठे संपादक हिंदु-मुसलमानांच्या एकीवर लिहिण्यांत गुंतले होते. त्याचवेळी आमच्या आयाबहिणींचें पातिव्रत्य मुसलमान गुंडांच्या हवालीं करण्यांत आलें होते ! हिंदु तरुण मुली (विवाहित किंवा विधवा) किती हातोहात मुसलमान गुंड पळवून नेतात, याची कल्पना अगदीं अल्पकाळांत घडलेल्या अशा उदाहरणांची यादी आम्हीं पुढें देत आहों, त्यावरून करिता येईल.”

यापुढें अशा उदाहरणांची एक लांबलचक यादी देऊन प्रो. बानर्जी लिहितात :-

गुंडांना अधिकाऱ्यांची फूस |

“असल्या पुष्कळ प्रकरणांत मुसलमान कामदारांनीं हिंदु मुली पळविणाऱ्या, त्यांच्यावर जबरदस्ती करणाऱ्या, त्यांचें पातिव्रत्य भ्रष्ट करणाऱ्या व खून करणाऱ्या गुन्हेगारास स्वतः आश्रय दिला आहे | अशा स्थितीत पुढें दासबाबूंच्या कराराप्रमाणें जेव्हां शेंकडा ८० सरकारी अधिकाराच्या जागा मुसलमानांना (त्यांची पात्रापात्रता न पाहतांही) दिल्या जातील, तेव्हां दुबळ्या, असहाय व विस्कळित हिंदु समाजाची काय स्थिती होईल याची कल्पनाच करणें चांगलें |”

सारांश, स्वराज्यपक्ष किंवा गांधींचा असहयोग यांनीं आजपर्यंत असें धोरण स्वीकारिलें आहे कीं त्यांच्या हातून हिंदू-मुसलमानांचा समेट घडून येणें अशक्य आहे; किंवा हिंदूंचे रक्षण होणें अशक्य आहे! म्हणून, मुसलमानांच्या हितरक्षणासाठी जशी 'मुस्लीम लीग' तशी

हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदूसभा

अवश्य आहे अशी योजना झाल्यास कदाचित हिंदूसभा व मुस्लीम लीग यांच्यामध्यें वाटाघाट सुरु होऊन समेटही होईल. हें काम कांग्रेसपक्ष किंवा असहयोग करूं शकेल, हें संभवनीय नाहीं. त्यांच्या भरवशावर स्वस्थ राहतां येत नाहीं. तसेंच, हिंदू मुसलमानांच्या भांडणाचा प्रश्‍न लांबणीवर टाकणें किंवा त्याची उपेक्षा करणें हेंही योग्य नव्हें. जसजसा वेळ जाईल, तसतशी हिंदु मुसलमानांची फूट वाढतच आहे. काँग्रेसपक्षाचें म्हणणे असें कीं इंग्लंडची धोंड मानेवरून निघून आपणांस स्वराज्य मिळाले, तर मग हिंदू-मुसलमानांचे भांडण मागाहून मिटवितां येईल पण मुसलमानांचे म्हणणें थेट याच्या विरूद्ध | मुस्लीम लीगनें जाहीर केलें की “प्रथम आमच्या हितरक्षणाची तरतूद [झाली ] [पाहिजे ] [; ] [ती ] होईपर्यंत आम्हांला स्वराज्याचा पुढचा हप्ता नको [|" ] [मुसलमानांच्या ] [या ] [भाषेनंतर ] 'स्वराज्या' ची मागणी बंद पडली आहे. आणि आज