मध्यप्रांत-वऱ्हाड हिंदु परिषद ४७३
संघटन
आतां संघटनाचा विचार करूं. बंगाल सरकारच्या वार्षिक वृत्तांत असे उद्गार काढलेले आहेत :-
खिलाफतीच्या चळवळीनें मुसलमानांच्या विद्वेषी वृत्तींना चिथावणी देऊन, कायदा आणि सुव्यवस्था यांच्याविषयी त्यांच्या मनांत बेपर्वाई उत्पन्न केली. खिलाफत खालसा झाल्यानंतर, सरकारवर राग काढणें अशक्य असल्यामुळें, धर्मवेडानें पिसाळलेले
मुसलमान हिंदूंबरच उलटले |
त्यामुळें मलबार, पंजाब वगैरे प्रांतांत भयंकर दंगे झाले. खुद्द बंगालमध्ये या धर्मवेडाने असा कहर केला, हें मी एका स्वराज्यपक्षाच्या पत्राच्या शब्दांतच आपल्याला सांगतो. हिंदु स्त्रियांवरील अत्याचार ही बंगालमध्यें एक नित्याचीच बाब होऊन बसली आहे. पूर्वबंगाल व उत्तरबंगाल हे प्रांत गुंडांच्या अत्याचारांचें केंद्रस्थान होऊन बसलें असून, शेकडों स्त्रियां रोज त्यांच्या दुष्ट वासनेला बळी पडत आहेत. या अत्याचारांच्या सर्वच हकीकती वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होतात, असें नाहीं. दुर्लौकिकाच्या व बेअब्रूच्या भीतीने बहुधा अत्याचारांना तोंड फुटत नाहीं. बंगाल मधील या अघोर गुंडगिरीविषयी सुमतीदेवी आपल्या 'फॉरवर्ड' मधील लेखांत म्हणतात :-
बंगालमध्ये बोकाळलेली गुंडगिरी
सरकार किंवा लोक यांची दहशत गुंडांना उरलेली नाहीं. ते आपले
अत्याचार संघटित रीतीनें पार पाडतात. त्यांना शिक्षा होण्याचें भय उरलेलें नसल्यामुळें, आपला हा गुंडगिरीचा धंदा त्यांनी मजेनें चालविला आहे. बंगालमधील
स्त्रिया इतक्या दुर्बळ आहेत.
कीं त्यांना आपलें रक्षण करणें मुळींच शक्य होत नाहीं. व त्या गुंडांच्या पापवासनेला ततक्षणींच बळी पडतात. पण, लोकांना आपल्या स्त्रियांच्या अब्रूची कांहीं चाड आहे कीं नाहीं ? त्यांच्या सभोंवती रोज स्त्रियांवर होत असलेले हे अत्याचार ते शांतपणाने पहातात | आपल्या आया-बहिणींच्या अब्रूचे रोज निघत असलेले हे धिंडवडे पाहून, बंगाली लोकांचें