४७४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अंतःकरण विदीर्ण होत नाहीं काय ?
मला तर असें वाटतें कीं, त्यांची अंतःकरणे मेलीं आहेत. स्त्रियांच्या डोळ्यांतून सतत पडणाऱ्या अश्रुधारांनी त्यांच्या अंतःकरणाला द्रव येत नाहीं. त्यांच्या आया-बहिणींची हाक त्यांच्या कानावर जात नाहीं. माणुसकीला लाज आणणारे अत्याचार त्यांच्या स्त्रियांवर रोज होत आहेत पण या गुंडांचा प्रतिकार करावयाला कोणीहि पुढें येत नाहीं ! “
अशी स्थिती कां व्हावी ? सरकारला एक जुटीनें शह देण्यासाठीं, आम्ही
तुमच्या गुंडगिरीकडे दुर्लक्ष करूं
असा करारच मुसलमानांशी गांधी व स्वराज्यपक्ष यांनी केलेला दिसतो. आणि, म्हणून हिंदू स्त्रियांवर हवे ते अत्याचार करण्याची मुसलमानांना मोकळीक मिळालेली दिसते ! गांधी व स्वराज्यपक्ष यांच्या दुष्ट धोरणांचा हा परिणाम आहे. या सर्व
अनर्थाच्या मुळाशी जातिभेद
आहे. श्री. रमेशचंद्र बानर्जी म्हणतात :- “ज्या समाजांत जातिभेदामुळें हजारों तट पडले आहेत, त्या n {संघटन होणें, कधीं तरी शक्य आहे काय ? वाण्यावर गुंडानें चढाई केली, तरे त्यांचें ब्राह्मणाला कांही वाटत नाही ! चांभारावर मुसलमान गुंडाने हल्ला केला, तर कायस्थ तो मुकाट्याने पहातो ! बंगालमध्ये हिंदु समाजांत अशी एकच जात आहे कीं, जी सुसंघटित रीतीनें आपल्या स्त्रियांवर झालेल्या हल्ल्यांचा प्रतीकार करते. या नामशुद्रांची
बंगाली अंत्यजांची कामगिरी
अत्यंत स्पृहणीय आहे. त्यांनीं केवळ स्वतःच्याच जातीचें नव्हे, तर वरिष्ठ जातीच्या अब्रूचेंहि अनेक प्रसंगी संरक्षण केलें आहे. मुसलमानांच्या या अत्याचारांच्या सर्वंकष लाटेला जर या नामशुद्रांनी धैर्याने आळा घातला नसता, तर बंगालमधील ब्राह्मण, कायस्थ वगैरे सर्व वरिष्ठ जाति त्या लाटेत वाहून गेल्या असत्या. पण, हे नामशूद्र, हिंदु समाजाचे आणि
हिंदुधर्माचे हे संरक्षक अस्पृश्य
समजले जातात !
बंगाल्यांतील या भयंकर परिस्थितीवरून आपल्या संघटनाच्या आवश्यकतेची कल्पना येईल. हीच स्थिती सामान्यतः इतरहि प्रांतातून आढळतें. म्हणून, हिंदूसभेनें संघटनांचे कार्य हातीं घेतले असून, हिंदू समाजांतील सर्व जातींनी, सर्व वर्गानी हे अत्याचार आपल्याच जातीवर व वर्गावर होत आहेत अशा भावनेने त्यांचा एकजुटीने प्रतिकार केला पाहिजे. हिंदुसभेनेंहि हीं